करिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा

करिश्मा, रवीनाशी नाव जोडण्यात आलेल्या या मुलाला तुम्ही ओळखलंत का? आज फक्त लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नाही तर बॉलिवूडवरही करतो राज्य...

दिक्षा पाटील | Updated: Apr 2, 2024, 11:25 AM IST
करिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा title=
(Photo Credit : Social Media)

बॉलिवूडमध्ये असे काहीच कलाकार आहेत ज्यांनी एकामागे एक हिट चित्रपट दिलेत. त्यापैकी एक हा अभिनेता अजय देवगण आहे. अजयनं गेल्या अनेक वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपट दिलेत. अजयच्या कामाप्रमाणेच त्याचं खासगी आयुष्य हे तितकंच चर्चेत असतं. त्याचं कारण म्हणजे अजयचं नाव इतर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात येतं. आज अजय देवगण हा त्याचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्तानं आज त्याच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

अजय देवगण आणि काजोल हे आनंदी आयुष्य जगत आहेत. ते दोघं अनेकदा एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्ट या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण एक काळ असा होता जेव्हा अजय चर्चेत असण्याचं कारण त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. मीडियामध्ये त्याच्या विषयी अनेक चर्चा सुरु होत्या. अजय देवगणचं नाव हे रवीना टंडन आणि करिश्मा कपूरसोबत जोडण्यात आलं होतं. सगळ्यात आधी तो रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये होता अशी चर्चा होती. तर त्यानंतर तो करिशअमा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होता अशी चर्चा सुरु झाली. असं म्हटलं जातं की करिश्मा आणि अजय देवगणची जवळीक पाहता अजय आणि रवीनाचा ब्रेकअप झाला होता. त्याशिवाय अजय देवगणचं नाव तब्बू आणि मनीषा कोयरालाशी देखील जोडण्यात आलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अजय देवगन आणि काजोलनं काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 1999 मध्ये लग्न केलं. त्यानंतर ते आनंदी आयुष्य जगत होते अशात अजय आणि कंगना रणौतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. त्याचा देखील त्या दोघांच्या नात्यावर परिणाम झाल्याचे म्हटले जातं. वन्स अपॉन ए टाइम इन मुंबईच्या शूटिंग दरम्यान, कंगना आणि अजयमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे म्हटलं जाते.

हेही वाचा : अवघ्या 22 व्या वर्षी 'ही' अभिनेत्रीकडे स्वत:चं Private Jet; वर्षभराची कमाई किती माहितीये?

अजय देवगनच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर त्यानं 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फूल और कांटे' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आजही त्याचा मोटरसाइकलवर दिलेल्या स्टंटची चर्चा होते. या दरम्यान, अजय देवगणचे अनेक चित्रपट हे हीट झाले आणि प्रेक्षकांच्या मनावर तो राज्य करु लागला. अजयला त्याच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. आजही अजय देवगण हा चित्रपटांमध्ये अॅक्शन करताना दिसतो.