Sidhu Moosewala Passed Away: वादग्रस्त सिंगरपासून ते राजकारणात एन्ट्री;अशी होती सिद्धू मुसेवालाची कारकीर्द

कॉग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची दुदैवी घटना  घडलीय.

Updated: May 29, 2022, 09:27 PM IST
Sidhu Moosewala Passed Away: वादग्रस्त सिंगरपासून ते राजकारणात एन्ट्री;अशी होती सिद्धू मुसेवालाची  कारकीर्द title=

मुंबई : कॉग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची दुदैवी घटना  घडलीय.मुसेवाला आपल्या चारचाकीतून जात असताना मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात हल्लेखोरांनी गोळीबार केला.या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पंजाबच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दरम्यान एक वादग्रस्त सिंगरपासून ते राजकारणाता एन्ट्री कशी होती सिद्धू मुसेवालाची कारकीर्द जाणून घेऊयात... 

खरं नाव काय ?
सिद्धू मुसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू होते. मात्र 
संगीत जगतात ते सिद्धू मुसेवाला म्हणून प्रसिद्धी होते. तो पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मुसा गावचा रहिवासी होता. त्यामुळेच त्यांच्या नावापुढे गावाचे नाव लावले होते. कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, मुसेवालाचे वडील भोला सिंह हे माजी लष्करी अधिकारी आहेत, तर त्यांची आई चरण कौर गावच्या सरपंच आहेत.

शिक्षण 
सिद्धूच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्याने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. याच काळात त्याने 
संगीत शिकले आणि पंजाबी गायक म्हणून तो प्रसिद्ध झाला. तो काही वर्षांसाठी कॅनडाला गेला होता. 

'या' गाण्यांनी दिले स्टारडम

सिद्धू मुसेवाला यांची अनेक गाणी गाजली, या गाण्यांनी त्याला मोठे स्टारडम मिळवून दिले. सिद्धू मुसेवाला नेहमीच वादग्रस्त पंजाबी गायक म्हणून ओळखले जातात. मूसेवाला यांनी खुलेआम बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'जट्टी जियोने मोड़ दी बंदूक वारगी' या त्याच्या गाण्याने १८व्या शतकातील शीख योद्धा माई भागोच्या संदर्भात वाद निर्माण केला होता. मात्र, या वादानंतर मूसवाला यांनी स्वतः माफी मागितली होती.

'संजू' गाण्यावरून वाद 

2020 मध्ये मुसेवालाच्या 'संजू' गाण्याने वाद निर्माण केला होता. एके-47 गोळीबार प्रकरणात सिद्धू मुसेवालाला जामीन मिळाल्यानंतर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याची तुलना अभिनेता संजय दत्तसोबतही करण्यात आली. मे 2020 मध्ये, बर्नाळा गावातील फायरिंग रेंजवर गोळीबाराची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मात्र, नंतर त्यांना या प्रकरणात जामीनही मिळाला.

सुरक्षा काढून घेतली 
पंजाब सरकारने शनिवारीच 424 धार्मिक, राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यंची सुरक्षा कमी केली होती. यामध्ये सिद्धू मुसेवालांचंही नाव होतं. ही सुरक्षा कमी केल्याच्या एक दिवसानंतरच त्यांची हत्या झाली आहे.  

राजकारणात प्रवेश
सिद्धू मुसेवाला यांचा राजकीय प्रवास गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू झाला. निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी निवडणुकीतही सक्रिय सहभाग घेतला.