पॉर्नस्टार Mia Khalifa दिसणार Bigg Boss OTT 2 मध्ये? पडद्यामागील घडामोडींना वेग

Bigg Boss OTT 2 Mia Khalifa : 'बिग बॉस ओटीटी 2' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमात पॉर्नस्टार मिया खलिफा दिसणार हे कळल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. पण अशात अजून कोणीही दुजोरा दिलेला नाही. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 11, 2023, 11:27 AM IST
पॉर्नस्टार  Mia Khalifa दिसणार Bigg Boss OTT 2 मध्ये? पडद्यामागील घडामोडींना वेग title=
(Photo Credit : Mia Khalifa Insatgram)

Bigg Boss OTT 2 Mia Khalifa : 'बिग बॉस ओटीटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा 2 सीझन येणार हे कळल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला होता. या कार्यक्रमांच्या चाहत्यांची संख्या ही खूप जास्त आहे. यावेळी बिग बॉस ओटीटीचा हा सीझन लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर नाही तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार आहे. अचानक करण जोहरला काढत सलमानला सुत्रसंचालन करण्याची संधी कशी दिली हे अनेकांना कळलेच नाही. पण आता या कार्यक्रमात कोणते कलाकार हजेरी लावणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर आहेत. 

‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये कोणते सेलिब्रिटी दिसणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटी यावेळी ‘बिग बॉस ओटीटी 2’ च्या टीमनं कॉमेडियन कुणाल कामरा, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तसेच श्रीलंकन ​​गायक योहानी यांच्याशी संपर्क साधल्याचे म्हटले आहे. इतकंच काय तर त्यांनी या सीझनसाठी लोकप्रिय पॉर्नस्टार मिया खलिफाशी देखील संपर्क साधला असे म्हटले जात आहे. 

ट्विटरवर अससलेल्या ‘बिग बॉस तक’ या अकाऊंटच्या रिपोर्ट्सनुसार, मिया खलिफा आणि राज कुंद्रा यांच्याशी याविषयी चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. सगळ्यांना आता मिया खलिफा खरचं त्यांना ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये दिसणार का? हा प्रश्न पडला आहे. दरम्यान, मिया खलिफानं जर या कार्यक्रमासाठी होकर दिला तर ती पहिली पॉर्नस्टार नसेल जी तुम्हाला कोणत्या कार्यक्रमात दिसेल. मिया खलिफा आधी आताची बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी देखील अशाच एका कार्यक्रमात दिसली होती. तो कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस 9’ यात सनीला बोलावण्यात आले होते. त्यानंतर सनीचं आयुष्य बदललं आणि तिनं अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यामुळे तिच्यानंतर मिया खलिफा देखील आपल्याला ‘बिग बॉस ओटीटी 2’ दिसू शकते असं म्हणायला हरकत नाही. 

हेही वाचा : ग्रामीण भाषेत रितेशची पोस्ट! चाहते म्हणाले, "या वाघाची शिकारही घरच्या हरणीनं केली"

राज कुंद्राविषयी बोलायचे झाले तर पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यानंतर राज कुंद्रा चर्चेत आला होता. राज कुंद्रा हा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रानं तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षाही भोगली आहे. आता जर तो या कार्यक्रमात आला तर त्याला त्याची बाजु मांडण्याची संधी मिळेल अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. याशिवाय निर्मात्यांनी ज्येष्ठ पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनाही ऑफर पाठवल्याची बातमी आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही