'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासा

Aly Goni Supports Krishna Mukherjee : अली गोनीनं एका मुलाखतीत कृष्णा मुखर्जीला पाठिंबा दिला आहे. त्यावेळी त्यानं आम्ही मदत करु शकत नाही असं देखील सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 29, 2024, 11:42 AM IST
'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Aly Goni Supports Krishna Mukherjee : 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जीनं निर्माते कुंदन सिंहवर गंभीर आरोप केले. कृष्णानं नुकतीच एक पोस्ट शेअर करत 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिनं सांगितलेल्या घटनांनी सगळ्यांना मोठा धक्का बसला. तिनं शोचे निर्माते आणि त्यांची टीमविषयी केलेल्या या पोस्टनंतर आता अभिनेता अली गोनीनं जे काही सांगितलं ते ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. 

अली गोनीनं टेलीचक्करला दिलेल्या एका मुलाखतीत या घटनेविषयी संपूर्ण सत्य सांगितलं आहे. अलीचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अली गोनी बोलताना दिसतोय की "कृष्णानं काल एक पोस्ट शेअर केली, ज्या विषयी तिनं लिहिलं आहे, ती व्यक्ती आज पोस्ट शेअर करत सांगत आहे की कृष्णा खोट बोलते. पण हे सगळं खोट नाही, कारण जेव्हा त्यांना कृष्णाला रुममध्ये बंद केलं होतं तेव्हा तिनं मला फोन केला होता, चिरागला फोन केला होता. ती मडमध्ये शूट करत होती कोणी पोहचू शकलं नाही, पण तिला रुममध्ये बंद करण्यात आलं होतं. ती खूप रडत होती." 

हेही वाचा : Live कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry! जाणून घ्या कारण

पुढे याविषयी सविस्तर सांगत अली गोनी म्हणाला, "आम्ही सगळे खूप लांब होतो, त्यामुळे तिची मदत करु शकलो नाही. आज ही व्यक्ती (कुंदन सिंग) हे सगळं खोट असल्याचं बोलत आहे. मला फक्त इतकं सांगायचं आहे की ही जी पण व्यक्ती आहे कुंदन मी त्याला पर्सनली ओळखत नाही. पण जर सगळेच लोक इतक्या विश्वासानं बोलत आहेत की तिला तिचे सगळे पैसे दिले आहेत. तर तुमच्याकडे बॅंक डिटेल असतील ना. कारण टीव्हीचे जितके पण पैसे असतात ते बॅंक ट्रान्सफर होतात. तर मला पण विश्वास आहे की तुमच्याकडे त्या डिटेल्स असतील. तुम्ही त्या डिटेल्स आम्हाला दाखवत का नाही, ज्यानं हे कळेल की तुम्ही कृष्णाच्या अकाऊंटला सगळे पैसे दिले आहेत. कृपया खोटं बोलू नका, कारण कृष्णा खोट बोलत नाहीये. तिनं खूप सहन केलं आहे. आम्ही जेवढे तिचे मित्र आहोत, आम्ही पाहिलं आहे. तुमच्याकडे प्रफू असेल तर दाखवा."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, काल कृष्णा मुखर्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दंगल या चॅनलवर असलेल्या 'शुभ शगुन' या मालिकेचे निर्माते कुंदन सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते.