'तू खिल्ली उडवतेस...', शोमध्ये श्वेतावर संतापल्या जया बच्चन, तर नव्यावर काढला सगळा राग

Jaya Bachchan - Shweta Bachchan Fight : जया बच्चन आणि श्वेता बच्चनमध्ये 'नव्या नवेली नंदाच्या' शोमध्येच झालं भांडण. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 24, 2024, 06:22 PM IST
'तू खिल्ली उडवतेस...', शोमध्ये श्वेतावर संतापल्या जया बच्चन, तर नव्यावर काढला सगळा राग title=
(Photo Credit : Social Media)

Jaya Bachchan - Shweta Bachchan Fight : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते.  त्यामुळे त्यांचा रागिट स्वभाव आहे असं अनेक लोक बोलतात. पण त्यांच्या जवळचे लोक त्यांचा खूप गोड स्वभाव आहे. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर 'कॉफी विथ करण' करण जोहरच्या या शोमध्ये नीतू सिंग यांनी हजेरी लावली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की जया बच्चन हे मुद्दामून करतात. आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ 'वॉट द हेल नव्या' च्या नव्या सीजनमध्ये श्वेता आणि जया बच्चन यांचात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. जया बच्चन यांना इतका राग आला की त्या कोणत्याही प्रश्नाची उत्तर देत नव्हत्या. या एपिसोडमध्ये त्यांच्यासोबत अगस्त्य नंदानं देखील हजेरी लावली होती. 

'वॉट द हेल नव्या' च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये आजच्या जगात असलेले पुरुष आणि आधीच्या काळात असलेले पुरुषांवर चर्चा सुरु होती. अगस्त्यनं पहिल्यांदा या शोमध्ये हजेरी लावली. नव्यानं विचारलं की 'अगस्त्य तुला वाटतं का की पुरुष त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी चर्चा करतात की मोकळेपणानं बोलतात?' जया बच्चन म्हणाला, 'हे खूप पर्सनल आहे आणि यात काहीही हरकत नाही.' अगस्त्य म्हणाला, 'प्रत्येकामध्ये त्यांच्या भावान त्यांच्यापर्यंत ठेवण्यातची एक पातळी असते. कोणाला वाटतं की समोरच्याला त्रास व्हायला नको, कोणाला वाटतं की समोरचा काय विचार करेल कशी प्रतिक्रिया देईल किंवा त्याला माझ्या भावना कळतील की नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, श्वेता म्हणाली, मला वाटतं की आजकाल पुरुष याविषयावर मोकळे पणानं बोलू लागले आहेत. तर जया म्हणाल्या, श्वेता तुला वाटतं की आजकाल यावर मोकळेपणानं बोलू लागले आहेत. लोकं डिप्रेशनविषयी बोलत आहेत. मी जास्त लोकांना मेंटली एग्झॉस्टेड आहे असं बोलताना ऐकते. 

जया बच्चन असं बोलत असताना श्वेता त्यांनामध्येच थांबवते आणि बोलते की 'लोकं नाही मी नेहमी तुला हे बोलताना ऐकते . याचा अर्थ असा होतो की मला एकटं सोडा.' जया तोंड फिरवून बोलतात की मी तेच करतेय. तेव्हा नव्या हळूच श्वेताला बोलते की 'तू हे बोललीस म्हणजे तुझ्यात खूप हिंमत्त आहे.' लगेच जया बच्चन रागवतात आणि म्हणतात, 'ठीक आहे, मला गप्प करा.'

त्यानंतर त्या दोघांमध्ये असलेला या चर्चेत श्वेता म्हणाली, 'मी तुम्हाला गप्प करत नाही आहे. मी आहे कोण तुम्हाला गप्प करायला? तुम्ही बोलायला हवं.' नव्या या सगळ्या गोष्टी सांभाळताना दिसते आणि बोलते की 'लोक मेंटली दमतात, आजी बरोबर बोलते. आम्ही रोज 100 गोष्टींचा सामना करतो.' त्यानंतर श्वेता बोलते की 'आई बोल.' जया तोंड फिरवून बोलतात, 'नाही, मला जे बोलायचं होतं ते झालं.' जया रागावतात आणि बोलतात की 'नाही, माझं बोलून झालं.' श्वेता बोलते 'हे चुकीचं आहे.' तर दुसरीकडे नव्या आणि अगस्त्य हसू लागतात. तर नव्याला हसताना पाहून जया तिच्याकडे रागात पाहतात. तर नव्या घाबरून बोलते 'मी अगस्त्य बोलला त्यावर हसते.'

हेही वाचा : 'माझी मुलगी आलियासारखी नसावी कारण...', रणबीर कपूरचं वक्तव्य चर्चेत

यावर जया आणखी संतापतात आणि बोलतात की तू खरंच चर्चा करतेस की खिल्ली उडवण्याच्या मूडमध्ये आहेस? नव्या बोलते खरंचं. जया बोलते, आज समाजासाठी ही सगळ्यात त्रासदायक गोष्ट आहे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री. शारिरीक आणि मानसिक रित्या अनेक गोष्टी सहन करतो. अगस्त्य यावर बोलतो की एन्ग्झायटी होते. मग युट्यूबवर अनेक गोष्टी सर्च करतो. तर नव्या सांगते की अगस्त्य खूप मेडिटेशन करतो.