Anushka Sharma Guru: अनुष्कानं शेअर केला गुरुमंत्र; नीम करोली बाबांशी आहे खास कनेक्शन

Anushka Sharma Neem Karoli Baba: अनुष्काच्या गुरुंचा हा गुरुमंत्र तुमच्या जीवनातही तितकीच सकारात्मकता आणेल. पाहा कोण आहेत नीम करोली बाबा आणि कोण आहेत त्यांचे परमभक्त..... 

Updated: Mar 8, 2023, 09:25 AM IST
Anushka Sharma Guru: अनुष्कानं शेअर केला गुरुमंत्र; नीम करोली बाबांशी आहे खास कनेक्शन  title=
Bollywood Actress Anushka sharma shares detaols about her spiritual journey and guru neem karoli baba

Anushka Sharma Neem Karoli Baba: असं म्हणतात की, आयुष्यात सर्वकाही सुरळीत असलं तरीही गुरुची साथही तितकीच महत्त्वाची असते. कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ देण्यापासून ते अगदी जगण्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा दृष्टीकोन गुरुच आपल्याला देत असतात. प्रत्येकाची गुरुची व्याख्या वेगळी आणि तितकीच प्रेरक. प्रपंचात रमलेल्यांना गुरुची साथ मिळाल्यास त्यांच्या अर्ध्याहून अधिक समस्या दूर होतात. अभिनेत्री (Bollywood Actress Anushka Sharma) अनुष्का शर्मालाची याची प्रचिती आली आणि तिनंही आपला आध्यात्मिक प्रवास चाहत्यांच्या, फॉलोअर्सच्या भेटीला आणला. 

पुरोगामी विचारांसोबतच अध्यात्मात तल्लिन होणाऱ्या अनुष्कानं नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. यामध्ये ती अमेरिकन गायक कृष्णा दास यांच्यासोबत दिसत आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर, कृष्णा दासही अनुष्का प्रमाणंच (Neem Karoli Baba) नीम करोली बाबा यांचे भक्त. गुरुसखा भेटल्याक्षणी होणारा आनंद अनुष्कानं पोस्ट केलेल्या या फोटोंमधून स्पष्ट पाहता येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

कृष्णा दास आणि अनुष्काचं नातं... 

अनुष्कानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अमेरिकन गायक कृष्णा दाससुद्धा नीम करोली बाबा यांचे भक्त आहेत. खुद्द अनुष्काही त्यांच्या विचारांनी प्रभावित असून, त्यांचा प्रत्येक शब्द तिला गुरुच्या जवळ नेणारा ठरत आहे. म्हणूनच तिनं त्यांचे शब्दही फॉलोअर्सच्या भेटीला आणले आहे. 

काय म्हणतात कृष्णा दास? 

'प्रार्थनेमुळं माझ्या मनात प्रेमाची भावना जागृत होते जी माझ्या नीम करोली बाबांसाठी आहे. असं पाहिलं तर कमी उंची असणारं, अंगावर चादर घेतलेलं हे एक वृद्ध व्यक्तीमत्त्वं. पण, त्यांच्या असण्यातही प्रेमाच्याच भावनेची जाणीव होते', असे त्यांचे शब्द अनुष्कानं तिच्या पोस्टच्या कॅप्शनमधून सर्वांपर्यंत पोहोचवले. 

हेसुद्धा वाचा : Who is Neem Karoli Baba : विराट- अनुष्कासाठी ज्यांचे उपदेश प्रमाण, असे नीम करोली बाबा आहेत तरी कोण?

 

अनुष्का आणि विराट हे दोघंही नीम करोली बाबा यांचे भक्त आहेत. यंदाच्याच वर्षी जानेवारी महिन्यात या जोडीनं बाबांच्या आश्रमाला भेट दिली होती. यावेळी मुलगी वामिकाही त्यांच्यासोबत होती. 20 व्या शतकातील काही संतमंडळींमध्ये नीम करोली बाबा यांचं नाव घेतलं जातं. असं म्हटलं जातं की वयाच्या 17 वर्षीच त्यांना आयुष्याचं सार ठाऊक झालं होतं. दिव्य चमत्कारांतून ते आजही भक्तांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवून आहेत. नैनीताल येथील कैंची धाम येथे त्यांचा आश्रम आहे. जिथं आजही अनेक भाविक बाबांच्या आशीर्वादासाठी येऊन त्यांच्या समाधीपुढं नतमस्तक होतात.