Apple च्या स्वीव्ह जॉब्स यांची लेक आहे All Rounder, मॉडेलिंगसोबत आहेत 'हे' छंद

Apple चे सहसंस्थापक दिवंगत अब्जाधीश स्टीव्ह जॉब्स यांची लेक इव्हचे लाखो चाहते आहेत. 

Updated: Aug 26, 2022, 01:49 PM IST
Apple च्या स्वीव्ह जॉब्स यांची लेक आहे All Rounder, मॉडेलिंगसोबत आहेत 'हे' छंद title=

मुंबई : Apple चे सहसंस्थापक दिवंगत अब्जाधीश स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची मुलगी इव्ह जॉब्स (Eve Jobs) ही मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. इव्हचे लाखो चाहते आहेत. इव्ह ही 24 वर्षांची आहे. इव्हला फक्त मॉडेलिंगची आवड आहे असं नाही तर तिला आणखी दुसरे छंद आहेत. इव्हला घोडेस्वारी आवडते. ती अनेकदा घोडेस्वारी स्पर्धांमध्ये भाग घेताना दिसते. इव्हचे मित्र आणि चाहते तिला अष्टपैलू इव्ह (All Rounder Eve) बोलतात. चला तर इव्ह विषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊया. 

आणखी वाचा : 'ही' चिमुकली आहे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री, सलमान आणि शाहरुख खानसोबत दिले हिट चित्रपट

इव्ह जॉब्स सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. इव्ह सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. इव्हनं अनेक मोठ्या ब्रँडसोबत मॉडेलिंग करार केले आहेत. अब्जाधीशही लेक असून इव्ह ही स्वावलंबी आहे. बऱ्याचवेळा तिच्या जाहिराती या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 

आणखी वाचा : 'प्रोड्युसरनं घरी बोलावलं अन् माझं पोट...', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वीव्ह जॉब्सनं सुमारे 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती मागे सोडली. परंतु इव्हला एक पैसाही वारसा म्हणून मिळाला नाही, कारण तिची आई लॉरेन पॉवेल-जॉब्स म्हणाली की तिचे कुटुंब 'संपत्ती जमा करण्यावर' विश्वास ठेवत नाही. लॉरेन पॉवेल-जॉब्स यांनी त्यांच्या मुलीला ज्या मूल्यांवर मोठं केलं तीच मूल्य इव्हमध्ये आहेत. 

आणखी वाचा : अभिनेत्याला 6 महिन्यांसाठी Sex न करण्याचा सल्ला, पण नेमकं कारण काय़? चर्चांना उधाण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इव्ह एक सेल्फ मेड वुमन आहे. इव्हनं तिच्या वडिलांच्या टेक व्यवसायाऐवजी मॉडेलिंग आणि घोडेस्वारी यांसारख्या अपारंपरिक व्यवसायांमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला असून ती या क्षेत्रात यशस्वी आहे. वडील स्टीव्ह जॉब्सप्रमाणे स्वत:चे स्थान मिळवण्यावर तिचा विश्वास असल्याचं तिनं सिद्ध करून दाखवलं आहे.

KBC 14 : रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे, स्पर्धक कोट्यवधींच्या बक्षिसाला मुकला

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इव्हला अॅडव्हेंचर असलेलं आयुष्य जगायला आवडतं. इव्हचं म्हणणं आहे की मॉडेलिंग आणि घोडेस्वारी यात समानता आहे. दोन्ही ठिकाणी स्वत: ला सिद्धकरण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. इव्ह मोठ्या मोठ्या ब्रँड्सची जाहिरात करते. इव्हचे सगळ्यात जास्त चाहते हे अमेरिका आणि यूरोपमध्ये आहेत. आशियायी देशात तिच्या चाहत्यांची खूप कमी संख्या आहे.