'इथून थेट शेतात जातेय...' बिग बींच्या नातीला ट्रॅक्टर चालवताना पाहून नेटकऱ्यांना आठवली आर्ची

Navya Naveli Nanda Tractor Video: अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नंदा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात (Navya Nanda Tractor Video) ती ट्रॅक्टर चालवताना दिसते आहे. यावेळी तिला या पोस्टवरून चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेकांना आर्चीची आठवण झाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 20, 2023, 10:13 PM IST
'इथून थेट शेतात जातेय...' बिग बींच्या नातीला ट्रॅक्टर चालवताना पाहून नेटकऱ्यांना आठवली आर्ची title=
(Photo : Navya Naveli Nanda | Instagram)

Navya Naveli Nanda Tractor Video: बच्चन कुटुंबीय या ना त्या कारणानं चर्चेत असतातच. सध्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नातीनं इंटरनेट गाजवलं आहे. ऐशौराम, पैसा, ग्लॅमरस जीवन सोडून अमिताभ बच्चन यांच्या नातीनं चक्क गुजरात येथील एका शेतात ट्रॅक्टर चालवतानाच व्हिडीओ व्हायरल केला आहे. तिच्या या व्हिडीओवर (Amitabh Bachchan Grand Daughter Video) चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्सही आल्या आहेत. एकानं लिहिलंय की, अरे, हे सेलिब्रेटी असं काही करताना सारखे तेच तेच कपडे काय घालतात? परंतु तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसादही आला आहे. यावेळी तिनं एका शेतात जाऊन ट्रॅक्टर चालवला आहे. तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून तिनं हा फोटो पोस्ट केला आहे. (amitabh bachchan granddaughter navya naveli nanda drives tractor in the village of gujarat)

नव्या नंदा ही अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा हिची मुलगी आहे. ती इन्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. ती आपले स्वत:चे पोडकास्ट इन्टाग्रामवर पोस्ट करते. ती एक आंत्रपनर आहे आणि मासिक पाळी संबंधित एक हेल्थ पोर्टल ती चालवते आहे. तिच्या पोडकास्टवर ती आपल्या आईला (Jaya Bachchan) आणि आजीला म्हणजेच श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांनाही बोलावते. मध्यंतरी तिच्या एका पोडकास्टमुळे ती आणि जया बच्चन प्रचंड चर्चेत आल्या होत्या. लग्नाआधी माझी नातं गरोदर झाली तरी चालेल असं मतं जया बच्चन यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. 

हेही वाचा - ''लग्नाचा काय बेत आहे?'' प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स 

यावेळी गुजरातच्या एका गावात नव्या नंदा पाहायला मिळाली. ती शेअर केलेल्या व्हिडीओत ती पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवताना दिसते आहे. त्याचसोबत नंतर त्या गावातील गावकऱ्यांशी बातचीत करताना दिसते आहे. सोबतच यावेळी तिनं एक प्रेझेंटेशनही त्यांना दाखवल्याचे कळून येते आहे. यावेळी तिनं साधा कॉटनचा पांढरा आणि पिस्ता रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्या या साधेपणाला पाहून चाहते तिच्यावर खूश झाले आहेत. सध्या तिच्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

हेही वाचा - ''अखेर माझं स्वप्न...!'' Anurag Kashyap च्या लेकीनं गुपचूप उरकला साखरपुडा, रोमॅण्टिक फोटो शेअर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मध्यंतरी नव्या नंदा आणि आर्यन खान (Aryan Khan) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्यानंतर तिनं यावर खुलासा केला की ते दोघं फक्त चांगले मित्र आहेत. नव्या आणि अमिताभ बच्चन हे एकत्र सध्या जाहिरातींमधून दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांचा नातू म्हणजे नव्याचा सख्खा भाऊ झोया अख्तरच्या 'द अर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आगमन करणार आहे.