'तरुणपणी असे नखरे दाखवायचे'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar Viral Video : ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2024, 01:19 PM IST
'तरुणपणी असे नखरे दाखवायचे'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Narkar Viral Video : झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या लोकप्रिय मालिकेतून खलनायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. ऐश्वर्या यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकरून देखील चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. दरम्यान, नुकताच ऐश्वर्या यांचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर एका नेटकऱ्यानं असभ्य भाषेत कमेंट केली आहे. त्यावर आता ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सेशनमध्ये योगाभ्यासाचे धडे घेत असल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी 'मॉर्निंग वाइब्स' असं कॅप्शन देखील दिलं आहे. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या फिटनेसचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तर एका नेटकऱ्यानं असभ्य कमेंट केली आहे. त्या नेटकऱ्यानं असभ्य कमेंट करत ऐश्वर्या यांना ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत तो नेटकरी म्हणाला, 'जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस.' त्या नेटकऱ्यांची ही कमेंट पाहताच ऐश्वर्या यांनी त्याला इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. ऐश्वर्या म्हणाल्या, 'भाऊ कशाला स्वत:ची लायकी दाखवता?' तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत ऐश्वर्याची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'तुमच्या मुळे योगा आणि फिटनेस साठी पन्नाशीलाही इन्स्पिरेशन मिळते. Keep it up'. या सारख्या अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aishwarya Narkar slams netizen who trolled her over a video

हेही वाचा : Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...

ऐश्वर्या नारकर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत त्या दिसत आहेत. तर या मालिकेत ऐश्वर्या यांच्यासोबत अजिंक्य ननावरे, तितीक्षा तावडे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, विवेक जोशी, मुग्धा गोडबोले हे कलाकार दिसत आहेत. ऐश्वर्या यांचे लाखो चाहते आहेत. त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 347K फॉलोवर्स आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहिले.