आधी अभिनेत्रीचं अपघाती निधन, आता सहकारी अभिनेत्याने आयुष्य संपवलं! नेमकं काय आहे प्रकरण?

Chandrakanth Suicide : अभिनेत्रीच्या अपघाती निधनानंतर आता अभिनेत्यानं केली आत्महत्या!

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2024, 03:01 PM IST
आधी अभिनेत्रीचं अपघाती निधन, आता सहकारी अभिनेत्याने आयुष्य संपवलं! नेमकं काय आहे प्रकरण? title=
(Photo Credit : Social Media)

Chandrakanth Suicide : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आठवड्याभरात एकामागे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पवित्रा जयरामाच्या निधनाच्या एका आठवड्यात तिचा को-स्टार चंद्रकांतचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला आहे.  

चंदू अशी ओळख असलेला तेलगू अभिनेता चंद्रकांतच्या अचानक झालेल्या निधनानं इंडस्ट्री आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. को-स्टार पवित्रा जयरामाच्या निधनाच्या बरोबर एक आठवड्यानंतर शुकवारी चंद्रकांतनं आत्महत्या केली आहे. चंद्रकांत हा तेलंगानाच्या अलकापुरमध्ये असलेल्या त्याच्या घरी मृतावस्थेत सापडला. त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांपासून तो डिप्रेशनमध्ये होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चंद्रकांत हा त्याची को-स्टार पवित्रा जयरामच्या जवळचा होता. पवित्राच्या निधनाचा त्याला खूप मोठा धक्का बसला होता. तो सोशल मीडियावर पवित्रा जयरामासाठी पोस्ट शेअर करत होता. पवित्रासोबत असलेल्या त्याच्या आठवणी तो सोशल मीडियावर शेअर करत होता. तीन दिवस आधी चंद्रकांतनं एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं होतं की 'हे नाना. फक्त दोन दिवसांची प्रतिक्षा करा.' त्याची ही पोस्ट पाहिल्यापासूनचं त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतकंच नाही तर चंद्रकांतनं दिवंगत अभिनेत्री पवित्रा जयरामासोबतचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यासोबत त्यानं लिहिलं होतं की 'गूड मॉर्निंग नाना. जीमची वेळ झाली आहे. आता आपल्या कोचनं कॉल केला. लव्ह यू.' चंद्रकांतची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांची भीती वाटू लागली. 

हेही वाचा : स्टेजवर सगळ्यांसमोर प्रीति झिंट, जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? जुना व्हिडीओ Viral

तीन दिवस आधी चंद्रकांतच्या एका जवळच्या व्यक्तीनं पवित्रासाठी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात चंद्रकांत हा पवित्रासोबत रोमॅन्टिक असल्याचे पाहायला मिळाले. त्यानं यावेळी कॅप्शनमध्ये लिहिलं की "बहिणी तुझी आठवण येते. जर शक्य असले तर कृपया परत ये. आम्ही तुला विसरू शकत नाही. तू नेहमीच आठवणीत राहशील. भाऊ चंद्रकांत तुझ्यासाठी रडतोय." 12 मे 2024 रोजी आंध्र प्रदेशच्या महबूब नगरमध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातात पवित्राचं निधन झालं.