बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी याने मंगळवारी त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 

Updated: Jul 22, 2022, 10:01 PM IST
 बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी याने मंगळवारी त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अदनान सामीने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्याचबरोबर फक्त एक पोस्ट बाकी आहे. ज्यामध्ये 'गुडबाय' असं लिहिलं आहे. अदनानने अचानक सर्व पोस्ट डिलीट करून सोशल मीडियाचा निरोप घेतल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळांनाही सुरुवात झाली आहे.

खरतर, अदनान सामीने त्याची इंस्टाग्राम पोस्ट हटवून फक्त एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ पोस्टमध्ये काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अलविदा लिहिलं आहे. अचानक अदनानचा ब्लँक इन्स्टा पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. अदनानच्या या पोस्टनंतर चाहते त्याबाबत विविध शक्यता व्यक्त करत आहेत. यासोबतच अदनानच्या या शेवटच्या पोस्टवर चाहते प्रश्न विचारत आहेत आणि कमेंट करत आहेत.

काही युजर्सचे म्हणणं आहे की, अदनानचं नवीन गाणं येत आहे आणि म्हणून हा एक पब्लिसीटी स्टंटचा एक मार्ग असू शकतो. त्यामुळे अदनान सामीने इंस्टाग्राम सोडल्याच्या विचाराने काहीजण नाराज झाले आहेत. या शेवटच्या पोस्टवर अलविदा लिहिल्यानंतर अदनानने यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

अदनान सामी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो
अदनाना सामीचे इंस्टाग्रामवर ६७२ हजार फॉलोअर्स आहेत. तो स्वतः देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि दररोज  नवीन पोस्ट शेअर करतो. याशिवाय अदनान सामीने त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केल्याने त्याची फॅन फॉलोइंग आणखी वाढली आहे. फिटनेसबाबत लोकं त्यांना खूप फॉलो करतात. अदनाना अनेकदा त्याचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करतो. अशा परिस्थितीत अचानक अदनानला 'अलविदा' म्हणणं चाहत्यांना खूप त्रास देत आहे.