तीन दशक उलटली तरी शाहरुख खानची क्रेझ कायम, Jawan चालण्यामागचे नेमके गणित काय?

Jawan Review : शाहरुखचा जवान पाहण्यासाठी का पसंती? तुम्हाला माहितीये का काय आहे त्या मागचं कारण... मग एका क्लिकवर जाणून घ्या....

प्रतिक्षा बनसोडे | Updated: Sep 11, 2023, 07:00 PM IST
तीन दशक उलटली तरी शाहरुख खानची क्रेझ कायम, Jawan चालण्यामागचे नेमके गणित काय? title=

Jawan Review : नव्वदीच्या दशकातील अनेकांना Shahrukh Khan खूप प्रिय आहे, पण सुमारे 3 दशकानंतरही शाहरुखची तीच जादू चित्रपटातून पाह्यला मिळते.बॉलीवूडमधील हल्ली रटाळ कथेमुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवले. अशातच अलीकडे साऊथ मूव्ही मात्र वेगवेगळ्या आशयाच्या स्टोरी आणत प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे वळण्यास भाग पाडत आहेत. हेच समीकरण SRK च्या सुद्धा लक्षात आले असावे बहुदा. याला कारण म्हणजे 'Jawan' पाहताना तुम्हाला कथानक साऊथ चित्रपटांशी साम्य असलेले दिसेल. या चित्रपटाचे बजेट 300 करोड आहे मात्र अवघ्या पाच दिवसात या चित्रपटाने 500 करोडपेक्षा अधिक कमाई केली.

पहिले कारण म्हणजे चित्रपटातील स्टारकास्ट, याबद्दल सांगायचे तर शाहरुखचा चित्रपट म्हटले की अगदी तगडी स्टारकास्ट आलीच. जवान चित्रपटात तसेच काही दिसते स्व:त शाहरुख, नयनतारा, दिपिका पदुकोन, विजय सेतुपती, सुनिल गोवर, संजय दत्त या दमदार स्टारकास्टला चित्रपटात भूमिका देण्यात आली.  हा चित्रपट खरेतर स्टोरीलाईनमुळे प्रेक्षकांच्या आणखी पंसतीस उतरलाय. या चित्रपटात खरा जीव फुकला तो म्हणजे दिग्दर्शक आणि कथालेखक Atlee Kumar ने, एटलीने या आधीसुद्धा तामीळमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण हिंदी चित्रपटश्रेत्रातील पहिल्याच चित्रपटाने त्याला नव्या उंचीवर नेले. चित्रपटाचा ट्रेलर वरवर पाहता जरी मनोरंजक वाटत असली तरी त्यातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न एटलीने केला. 

दुसरे कारण हल्ली सामाजिक विषयांवरील चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल वाढलाय. 'जवान' चित्रपट पूर्णपणे सामाजिक भाष्य करणाऱ्या थीमवर आधारित आहे. अॅक्शन, हलकीफुलकी कॉमेडी आणि वेगळी स्टोरीलाईन यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीला उतरतोय. चित्रपटातील स्टोरीलाईन तुम्हाला आजूबाजूला घडत असलेल्या घटनेची आठवण करुन देईल. चित्रपट पाहताना तुम्हाला पुढे काय याची उत्कठंता जाणवत राहील. चित्रपटाचे कथानक तुम्हाला खुर्चीवर खिळवून ठेवते, पण चित्रपटातील गाण्यांचा भडिमार प्रेक्षकांना सहन करावा लागतोय. 2 तास 45 मिनिटे कालावधीचा संपूर्ण चित्रपट आहे यामध्ये काही डॉयलॉग तुम्हाला विचार करायला भाग पाडतील तर काही दृश्य तुमच्या डोळ्याच्या पापण्या ओल्या करतील. सिनेमात दिलेला रोल प्रत्येकान पडद्यावर अतिशय उत्तम सादर केलाय त्यामुळे तुम्ही त्या पात्राशी नकळत कनेक्ट होताय. 

तिसरे कारण म्हणजे खानमंडळी आणि बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला हे समीकरण जमलेले आहे. पण 'झिरो' सिनेमा असेल किंवा 'जब हॅरी मेट सेजल' हे शाहरुखचे चित्रपट इतके कमाई करु शकले नाही. हल्लीच आलेला 'पठाण' चित्रपट बॉयकॉट ट्रेंड आणि सिनेमातील काही दृश्यामुळे चर्चेत राहिला पण बॉक्स ऑफिसवरील गल्ल्यावर याचा फरक पडला. मात्र 'जवान' या चित्रपटातून शाहरुखने वेगळी छबी प्रेक्षकांसमोर आण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला 'चक दे इंडिया' मधला शाहरुख आठवतोय का? तुम्ही अर्थातच म्हणाल हो तसाच काही शाहरुख तुम्हाला या चित्रपटात दिसेल. अनेकदा सामाजिक मुद्द्यावर न बोलणारा हा अभिनेता मात्र चित्रपटात अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घालताना दिसतोय. तुम्ही शाहरुखचे फॅन असाल किंवा नसाल तरी जवान चित्रपटातील स्टोरीलाईन तुमच्या मनात स्थान करुन जाईल हे मात्र नक्की..