Varuthini Ekadashi 2024: वरुथिनी एकादशीला गजकेसरी योग! 'या' राशींवर बरसणार भगवान विष्णूसह शनिदेवाची कृपा

Varuthini Ekadashi 2024 : वरुथिनी एकादशीला गजकेसरी योग, ऐंद्र योग आणि त्रिपुष्कर योग आहे. त्यात एकादशीचं व्रत शनिवारी आल्यामुळे यादिवशी विष्णूसह शनिदेवाची पूजा करण्यात येणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 4, 2024, 08:18 AM IST
Varuthini Ekadashi 2024: वरुथिनी एकादशीला गजकेसरी योग! 'या' राशींवर बरसणार भगवान विष्णूसह शनिदेवाची कृपा  title=
gajakesari yog on Varuthini Ekadashi Lord Vishnu and Lord Shani Dev grace will be showered on these zodiac sign

Varuthini Ekadashi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वरुथिनी एकादशीला तीन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. वरुथिनी एकादशीला  गजकेसरी योग, ऐंद्र योग आणि त्रिपुष्कर योग असल्याने याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. एकादशी ही शनिवारी असल्याने हा वार शनिदेवाचा आहे. त्यामुळे या राशींवर विष्णदेवासोबत शनिदेवाची कृपा बरसणार आहेत. कोणत्या राशींना लाभ होणार आहे जाणून घ्या. (gajakesari yog on Varuthini Ekadashi Lord Vishnu and Lord Shani Dev grace will be showered on these zodiac sign)

मेष (Aries Zodiac)  

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून एकादशीचा योग त्यांच्यासाठी भाग्यशाली आहे. धार्मिक कार्याता त्यांची रुची वाढणार आहे. कार्यक्षेत्रासंदर्भात कानावर चांगली बातमी पडणार आहे. कौटुंबिक व्यवसाय चालवणारे लोक त्यांच्या जुन्या योजनांमधून नफा मिळाणार आहे. तुम्ही उद्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाणार असून त्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळणार आहे. कुटुंबात सुख-शांती नांदेल आहे. वैवाहिक जीवनात प्रेम कायम असणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय खास असणार आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत खूप चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन स्त्रोतांकडून भरघोस नफा मिळणार आहे. ज्यामुळे तुमचे बँक बॅलेन्स वाढणार आहे. घरगुती समस्येतून शनिदेवाच्या कृपेने मुक्ती मिळणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सर्व आलबेल असेल. आपण आपल्या जोडीदारासह काही मालमत्ता खरेदी करणार आहात. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. जर तुम्ही काही नवीन काम सुरू करणार असाल तर शनिदेवाच्या कृपेने त्यात यश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांना संधी मिळणार आहे. नोकरदार लोकांची परिस्थिती सहकाऱ्यांच्या सहकार्याने सुधारणार आहे. तुमच्या सकारात्मक विचारसरणीचा तुम्ही चांगला फायदा घेणार आहात. अगदी तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे.

मकर (Capricorn Zodiac)   

एकादशीचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या लोकांना चांगला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होणार आहेत. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. शनिदेवाच्या कृपेने कायदेशीर बाबतीत दिलासा मिळणार आहे.  कौटुंबिक जीवनात समस्या दूर होणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेम मजबूत होणार आहे. 

मीन  (Pisces Zodiac)  

मीन राशीच्या लोकांसाठी शौर्यामध्ये वाढ होणार आहे. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे अनपेक्षित लाभामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. नोकरीतील लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही मोठी उपलब्धी होणार आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्ही तुमच्या बोलण्यात आणि वागण्याने समाधानी होणार आहात. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल, तर हा काळ उत्तम असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)