'कान्स 2024'च्या रिवेरा लूकमध्ये कियाराचा मनमोहक अंदाज तर ऐश्वर्याच्या अदांनी केलं चाहत्यांना घायाळ

आत्तापर्यंत अनेक मोठ-मोठ्या कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली. . या कार्यक्रमातील सेलिब्रिटींचे जबरदस्त लूक सोशल मीडियावर सतत दिसत आहेत. 

Updated: May 18, 2024, 06:57 AM IST
'कान्स 2024'च्या रिवेरा लूकमध्ये कियाराचा मनमोहक अंदाज तर ऐश्वर्याच्या अदांनी केलं चाहत्यांना घायाळ  title=

मुंबई : कान्स फिल्म फेस्टिवल कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ सध्या सुरु आहे. दरवेळीप्रमाणे यावेळीही बॉलिवूड कलाकार कान्सचा रेड कार्पेट गाजवण्यासाठी सज्ज आहेत. 14 मे पासून सुरू झालेलं हे फेस्टिवल  25 मे पर्यंत चालणार आहे.  कान्समध्ये जगभरातील सेलिब्रिटी आपल्या खास स्टाइलने चाहत्यांना प्रभावित करताना दिसतात. आत्तापर्यंत अनेक मोठ-मोठ्या कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली. . या कार्यक्रमातील सेलिब्रिटींचे जबरदस्त लूक सोशल मीडियावर सतत दिसत आहेत. आलिया भट्टसोबतच अनेक बॉलिवूड कलाकार कान्समध्ये आपला जलवा दाखवताना दिसले. 

हाताला प्लास्टर असातानाही ऐश्वर्याने यावेळीही कान्समध्ये सहभाग घेतला. हाताला गंभीर दुखापत झालेली असताना ऐश्वर्याने तिच्या चाहत्यांना निराश केलं नाही आणि कान्स २०२४ मध्ये आपला जलवा दाखवला. या व्यतिरीक्त बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनेदेखील  २०२४ मध्ये पदार्पण केलं आहे आणि तिच्या लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकताच कियाराने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये कियारा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कियाराचा मनमोहक लूक करतोय चाहत्यांना घायाळ
नुकताच कियारा अडवाणीने तिच्या इन्स्टाग्रामवर कान्स 2024 ने आपला लूक शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओत कियारा काळ्या रंगाच्या गाडीतून उतरताना दिसते आणि आपल्या आपल्या स्टाईलिश अंजाजात वॉक करताना दिसते. यानंतर अभिनेत्री आपल्या कातील अदांनी पोज देताना दिसते. कियाराच्या या व्हिडीओवर प्रेक्षक खूप पसंती देताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, Rendezvous at the Riviera.यावेळी, खूपच सिंपल हेअर स्टाईल करत आणि हलका मेकअप कियारा खूपच सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर ऐश्वर्या रायचा दुसरा लूकही सध्या समोर आला आहे. अभिनेत्रीचा हा लूक खूपच चर्चेत आहे. समोर आलेल्या लूकमध्ये ऐश्वर्या सिल्वर आणि हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. ऐश्वर्याच्या या लूकचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.