Ruturaj Gaikwad: मला खूप आनंद झाला...; प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर ऋतुराज गायकवाडचं अजब विधान

Ruturaj Gaikwad: आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला की, खरं सांगायचे तर मला वाटतंय की, चांगली विकेट होती. पिचला थोडं स्पिन होतं. मला वाटतं या मैदानावर 200 रन्स करता आले असते. 

सुरभि जगदीश | Updated: May 19, 2024, 07:14 AM IST
Ruturaj Gaikwad: मला खूप आनंद झाला...; प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर ऋतुराज गायकवाडचं अजब विधान title=

Ruturaj Gaikwad: आयपीएल 2024 च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात 27 रन्सने चेन्नईला धूळ चारत आरसीबीच्या टीमने थेट प्लेऑफचं तिकीट गाठलं आहे. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जचं यंदाच्या सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यानंतर चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड काहीसा नाराज दिसून आला. यावेळी सामन्यानंतर ऋतुराज काय म्हणाला ते पाहुयात.

सामन्यानंतर काय म्हणाला ऋतुराज गायकवाड?

आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला की, खरं सांगायचे तर मला वाटतंय की, चांगली विकेट होती. पिचला थोडं स्पिन होतं. मला वाटतं या मैदानावर 200 रन्स करता आले असते. आम्ही ठराविक अंतराने विकेट्स गमावत होतो. टी -20 सामन्यात असं होऊ शकतं.

ऋतुराजने पराभवाचं काय कारण सांगितलं?

ऋतुराज पुढे म्हणाला की, एकंदरीत सिझनबद्दल सांगायचं झालं तर 14 सामन्यांपैकी 7 गेम जिंकून मला खूप आनंद झाला आहे. फक्त शेवटचे दोन सामने जिंकता आले नाहीत. यावेळी टीममधील खेळाडूंना अनेक प्रकारच्या दुखापती झाल्या, दोन मुख्य गोलंदाजांची कमतरता, तसंच कॉन्वेचं फलंदाजीमध्ये अग्रस्थानी नसणं, मला वाटते की, हे तीन खेळाडू नसल्यामुळे मोठा फरक पडला. पहिल्या सामन्यात आमच्यासमोर अनेक आव्हाने होती. यावेळी सीएसकेच्या स्टाफने चांगली कामगिरी केली. 

वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानबद्दल ऋतुराज म्हणाला की, पाथिरानाला झालेली दुखापत आमच्यासाठी योग्य ठरली नाही. जेव्हा तुम्हाला दुखापत होते, तेव्हा तुम्हाला टीममध्ये संतुलन निर्माण करावं लागतं आणि प्रत्येक खेळासाठी टीम निवडावी लागते. आम्हाला आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागले. यावेळी दुखापतींचाही विचार करावा लागला. 

बंगळूरूला प्लेऑफचं तिकीट

चेन्नईचा 27 धावांनी पराभव करून आरसीबीने प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. तर यंदाच्या सिझनधील चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास थांबला आहे. 6 सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने सलग 6 सामने जिंकले अन् असंभव असा कमबॅक केला. 8 मे रोजी आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फक्त 3 टक्के असताना आरसीबीने टीमने आपली ताकद दाखवली आणि अखेर प्लेऑफमध्ये धडक दिली.