Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला अमृत सिद्धि योग 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, 12 वर्षांनंतर अद्भूत संयोगामुळे आर्थिक फायदा

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धि योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग जुळून आल्यामुळे काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 19, 2024, 07:48 AM IST
Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला अमृत सिद्धि योग 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, 12 वर्षांनंतर अद्भूत संयोगामुळे आर्थिक फायदा title=
Amrut Siddhi Yoga on Mohini Ekadashi will be lucky for these zodiac signs 12 years later financial gain due to wonderful combination

Mohini Ekadashi 2024 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. आज एकादशीला 12 वर्षांनी अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहे. द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धि योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Amrut Siddhi Yoga on Mohini Ekadashi will be lucky for these zodiac signs 12 years later financial gain due to wonderful combination)

मोहिनी एकादशी 'या' राशींसाठी ठरणार लकी!

मेष रास (Aries Zodiac)  

या लोकांना मोहिनी एकादशीला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. सर्व प्रलंबित कामं मार्गी लागणार आहेत. श्रीहरीच्या कृपेने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यात यशस्वी होणार आहात.

कर्क रास (Cancer Zodiac)   

मोहिनी एकादशीला जुळून आलेला शुभ संयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम आणि आर्थिक फायदा होणार आहे. या काळात मात्र पैशांवर नियंत्रण ठेवा. 

सिंह रास (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी मोहिनी एकादशी अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. या लोकांना अनेक क्षेत्रातून अनपेक्षित पैसे मिळणार आहेत. शत्रूंचा सामना करण्यात तुम्ही खंबीर असणार आहात. सहकाऱ्यांचं सहकार्य मिळणार आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

तूळ राशीच्या लोकांसाठीही मोहिनी एकादशी लाभदायक ठरणार आहे. पदोन्नतीचीही सुवर्ण संधी या लोकांना मिळणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)   

मोहिनी एकादशी ही मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. खर्च नियंत्रणात राहिल्यास तुम्हाला आर्थिक लाभ होईल. नवीन क्षेत्रात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)