जमीन नसलेलं गाव, गावकरी करतात बोटीनं प्रवास

आपल्यातल्या प्रत्येकालाच निसर्गसौंदर्य खुणावत असतं. समुद्रकिनारे,डोंगर दऱ्या, जंगल याचं प्रत्येकालाच अप्रुप वाटतं.   

May 17, 2024, 17:25 PM IST
1/8

कुठे गरम पाण्याचं कुंड तर कुठे ज्वालामुखी प्रत्येक ठिकाणाचं काही ना काही वैशिष्ट्ये पर्यटकांना आकर्शित करतं. असंच जगाचं लक्ष्य वेधून घेणारं गाव म्हणजे गिथॉर्न.  

2/8

नेदरलँडमधील या गावात जमीन नसून माणसं बोटीने प्रवास करतात.निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी जगभरातील बहुतांश पर्यटक नेदरलँडला भेट देतात.   

3/8

गीथहॉर्न या गावात मातीचा किंवा सिमेंट काँक्रेटचा रस्ता नसून हे  गाव जलमय आहे. 

4/8

चारही बाजूंना पाण्याने वेढलेल्या या गावात गावकरी दळणवळणासाठी बोटीचा वापर करतात.   

5/8

नैऋत्य नेदरलँडमधील हे गाव लोकप्रिय डच पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. 

6/8

वेनिस ऑफ नेदरलँड म्हणून गिथॉर्न या गावाला ओळखलं जातं. 

7/8

1958 मध्ये डच सिनेदिग्दर्शकाने फॅन फेअर नावाच्या सिनेमाचं शुटिंग केलं होतं. त्यामुळे गिथॉर्न हे गाव जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.   

8/8

या गावात पादचारी पुल नसल्याने चार ही बाजूला पाण्याने वेढलेलं गाव असल्याने इथल्या पारंपारिक बोटींग आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची कायम पसंती असते.