Indian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात? रेल्वे Horn च्या आवाजाचे अर्थ जाणून घ्या

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना अचानक होणाऱ्या या मोठ्या आवाजातल्या हॉर्नचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? 

May 18, 2024, 15:02 PM IST

Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा रेल्वेचा भोंगा वाजला की कित्येकांच्या कानठळ्या बसतात आणि काहीजण कान बंद करतात. 

 

1/7

रेल्वेगाडी

 Interesting Facts of Railway horn honking know details

Indian Railway : रेल्वेगाडी रुळावर असताना, यार्डात जाताना, आजुबाजूनं दुसरी रेल्वे जाताना किंवा अगदी ती रेल्वे फलाटावर येताना अनेकदा हॉर्न वाजवले जातात. 

2/7

तुम्हाला माहितीये?

 Interesting Facts of Railway horn honking know details

Indian Railway : अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा या हॉर्नचा आवाज नकोसा वाटतो. पण, त्यामागं दडलेला अर्थ तुम्हाला माहितीये? हे हॉर्न म्हणजे एक प्रकारचा इशारा असतात. लोको पायलटला हे इशारे लक्षात येतात. 

3/7

लहान हॉर्न

 Interesting Facts of Railway horn honking know details

लोको पायलटनं लहानसा हॉर्न वाजवला की समजावं प्रवासानंतर ही रेल्वे स्वच्छतेसाठी यार्डात जाण्यास तयार आहे. दोनदा लहान हॉर्न वाजल्यास लोको पायलट गार्डला ट्रेन प्रवासाला निघण्याची वेळ झाल्याचा इशारा देत आहेत असं समजावं. या हॉर्ननंतर गार्ड सिग्नल देतो आणि ट्रेन पुढच्या स्थानाच्या दिशेनं निघते. 

4/7

तीन लहान हॉर्न

 Interesting Facts of Railway horn honking know details

हे हॉर्न सहसा कमी वाजवले जातात. कारण, त्याचा अर्थ असतो धोका किंवा आपात्कालीन वेळ. रेल्वेवरील नियंत्रण गमावल्यानंतर लोको पायलट हा हॉर्न वाजवून गार्डला इशारा देतात. तर, चार लहान हॉर्न वापरल्यास त्याचा अर्थ रेल्वेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले आहेत असा होतो. रेल्वे इथून पुढं जाणार नाही यासाठीसुद्धा चार वेळा हॉर्न वाजवला जातो.   

5/7

सहा लहान हॉर्न

 Interesting Facts of Railway horn honking know details

रेल्वे एखाद्या संकटात सापडली असता आणि नजीकच्या एखाद्या स्थानकाकडे मदतीसाठी आवाहन करताना लोको पायलट सहावेळा लहान हॉर्न वाजवतात. हॉर्नचा आणखी एक प्रकार म्हणजे एक मोठा आणि एक लहान हॉर्न. लोको पायलट इंजिन सुरू करण्यााधी ब्रेक पाईप सिस्टीम सज्ज करण्यासाठी हा इशारा देतात.   

6/7

दोन लहान आणि एक मोठा हॉर्न

 Interesting Facts of Railway horn honking know details

दोनदा लहान आणि एक मोठा हॉर्न वाजल्यास हा गार्डला इंजिन नियंत्रित ठेवण्यासाठीचा इशारा असतो एखाद्या पॅसेन्जरनं इमरजेन्सी चेन खेचल्यास हा हॉर्न वाजवला जातो.   

7/7

सतत वाजणारा हॉर्न

 Interesting Facts of Railway horn honking know details

लोको पायलटनं हॉर्न सतत वाजवत ठेवला आणि दो लांब सुरात वाजला तर पुढच्या स्थानकावर रेल्वे थांबणार नाही, यासाठीचा हा प्रवाशांना देण्यात येणारा इशारा असतो. तर, रेल्वे क्रॉसिंगपाशी असणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी आणि रुळांपासून दूर राहण्यासाठीचा इशारा दोनदा थांबून हॉर्न वाजवत दिला जातो.