जितका पगार तितकीच वेगळी होईल कमाई! कसं शक्य आहे? सोप्या भाषेत समजून घ्या

| May 19, 2024, 05:59 AM IST
1/10

जितका पगार तितकीच वेगळी होईल कमाई! कसं शक्य आहे? सोप्या भाषेत समजून घ्या

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

Extra Income Ideas: नोकरीधंदा करणाऱ्यांपैकी अनेकजण आपली सेव्हिंग होत नसल्याची तक्रार करतात. भविष्यासाठी सेव्हिंग गरजेची आहे. पण पगार येतो तसा सर्व खर्च होतो. मग वेगळी गुंतवणूक कशी करणार? असा प्रश्न अनेकजण विचारतात. पण गुंतवणुक करण्यासाठी पगारापेक्षा मोठी इच्छाशक्ती हवी. 

2/10

तितकीच तुम्ही सेव्हिंग करु शकता

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

तुमचा जितका पगार आहे. तितकीच तुम्ही सेव्हिंग करु शकता. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. तुमच्या पगाराच्या रक्कमेला हात न लावता तुम्ही सेव्हिंग करु शकता. यासाठी एक फॉर्मुला आहे. 

3/10

दर महिन्याला वेगळी कमाई

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

समजा तुम्हाला 50 हजार पगार असेल. तर तुम्हाला तितक्याच रकमेची दर महिन्याला वेगळी कमाई होऊ शकते. यासाठी तुम्हाला महिन्याचे 30 टक्के वाचवावे लागतील. 

4/10

एसआयपीमध्ये गुंतवा

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

50 हजार पगारातून 30 टक्के वाचवलात तर महिन्याचे 15 हजार वाचतील. ही रक्कम तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवा. या रक्कमेवर दर महिन्याला 15 टक्के रिटर्न पकडले तरी ही रक्कम 41 लाख 79 हजार 859 रुपये इतकी होते. 

5/10

आता आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया.

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

 दर महिन्याला एसआयपीमध्ये 15 हजार रुपये गुंतवल्यास 5 वर्षात ही रक्कम 13 लाख रुपये इतकी होते. गुंतवणूकदारांनी अशाप्रकारे आणखी 3 वर्षे पैसे जमा करायचे. मद 8 वर्षांनी ही रक्कम वाढून 28 लाख इतकी होईल. तर 10 वर्षात ही रक्कम वाढून 41 लाख 79 हजार 859 रुपये इतकी होईल. 

6/10

पगार वाढला की गुंतवणूक वाढवा

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

दरवर्षी थोडीफार पगारवाढ होत असते.  पगार वाढेल तसा गुंतवणूकीची रक्कम वाढवत चला. 10 व्या वर्षापर्यंत 35 हजार 369 रुपयांपर्यंत बचत न्या. 

7/10

त्यात 10 टक्क्यांनी वाढ

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

50 हजार पगार असलेली व्यक्ती 15 हजार रुपयांची गुंतवणुक करतोय आणि दरवर्षी त्यात 10 टक्क्यांनी वाढ करतोय. तर 10 वर्षात एसआयपीची रक्कम 35 हजार रुपये होईल.

8/10

15 वर्षात मोठी रक्कम

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

10 वर्षात 15 टक्के रिटर्न्स पकडले तरी ही रक्कम 59 लाख 36 हजार 129 रुपये इतकी होते. 30 टक्के पगार वाचवून तुम्ही 10 ते 15 वर्षात किती मोठी रक्कम जमा करु शकता हे पाहा. 

9/10

30 टक्के भाग गुंतवा

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

या फॉर्मुलानुसार 10 वर्षापर्यंत पगाराचा 30 टक्के भाग गुंतवत असाल तर तुमच्याकडे 60 लाख रुपये असतील. 15 वर्षांमध्ये 1.66 कोटी रुपये बनतील.  आता ही रक्कम थेट फिक्स्ड डिपॉझिट केलात तर 1 लाखाहून अधिक व्याज मिळेल. म्हणजेच तुमच्या पगारा इतकी कमाई होऊ शकेल. 

10/10

पगाराला हात लावण्याची गरज लागणार नाही

Extra Income Ideas Benifits Of SIP Mutual Fund Investment

तुमचा पगार आणखी वाढला किंवा तुमच्या पार्टनरची तुम्हाला यात साथ लाभली तर आणखी गुंतवणूकीचे मार्ग शोधू शकता.  शेअर बाजार, पीपीएफ, गोल्ड बॉण्ड, रियल इस्टेट आणि शॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतवणूक करु शकता. तुम्ही 10 ते 15 वर्षानंतर याचे रिटर्न पाहिलात तर पगाराला हात लावण्याची गरज लागणार नाही. तुमच्या गुंतवणुकीतून तितकीच रक्कम तयार झालेली असेल.