MS Dhoni: पराभवानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या धोनीचे डोळे पाणावले; फोटो होतोय व्हायरल

MS Dhoni: शनिवारी आयपीएलमध्ये रंगलेल्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 27 रन्सने पराभव केला. या पराभवानंतर चेन्नईचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. 

| May 19, 2024, 08:21 AM IST
1/7

रॉयल चॅलेंजर बंगळूरूने चेन्नईचा 27 रन्सने पराभव करत सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सीएसकेचा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढलं.

2/7

यंदाचा सिझन चेन्नईसाठी खास मानला जात होता, कारण ही आयपीएल महेंद्रसिंग धोनीची शेवटची असल्याची चर्चा आहे. 

3/7

अशातच या सिझनमध्ये प्लेऑफ गाठू न शकल्याने धोनी भावूक झाल्याचं दिसून आलं. 

4/7

चेन्नईचा पराभव झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या धोनीचे डोळे काहीसे पाणावले होते. 

5/7

धोनीचं ही अवस्था पाहून चाहत्यांना देखील वाईट वाटलं आहे. 

6/7

धोनीने त्याच्या आयपीएल कारकि‍र्दीत 264 सामने खेळले असून 24 अर्धशतकांसह 5243 रन्स केलेत.

7/7

धोनी या सिझननंतर पुढेही खेळण्याचा निर्णय घेणार की, ही त्याची कारकि‍र्दची अखेर करणार, हे पाहावं लागणार आहे.