मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आहे 'ही' पत्रकार, व्यवस्थित मराठीही बोलता येत नसताना कशी मिळाली पहिल्या चित्रपटाची ऑफर?

Birthday Special : फोटोमधील चिमुकली एक पत्रकार होती त्यानंतर तिने सिनेसृष्टीचा मार्ग निवडला. तिला आता मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखलं जातं. 

May 18, 2024, 10:34 AM IST
1/9

तुम्हाला अंदाज आला असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहेत ते. हो सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस आहे. 

2/9

गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2 अशी मराठी चित्रपटांची भलीमोठी यादीच आहे. 

3/9

मराठी नाही तर तिने हिंदीमध्ये 'ग्रॅण्ड मस्ती' आणि 'सिंघम रिटर्न्स' ही काम केलंय. तिने सिनेसृष्टीत एक मोठा टप्पा पार केलाय. पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. 

4/9

सोनाली मुळची पुण्याची वडील लष्करात डॉक्टर तर आईही पण लष्करातच होती. तिची आई पंजाबी तर वडील मराठी असं त्यांचं छोटंस कुटुंब. सोनालीचं बालपण लष्कर आणि आर्मी स्कूलमध्ये गेलं. 

5/9

पण तिने पत्रकारीतेचा मार्ग निवडला. फर्ग्युसन कॉलेजमधून तिने मास कम्युनिकेशन अँड जर्नेलिझम केलं. कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेल केलं. 2005 मध्ये तिने एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि ती फस्ट रनरअप ठरली. 

6/9

तिची मराठी इंडस्ट्रीतील अभिनयाला सुरवात झाली ती ई- टीव्हीवरील ‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेतून. तिला सुरुवातीला मराठी नीट बोलता येत नव्हती. या मालिकेपासून तिने मराठीचा अभ्यास सुरु केला. 

7/9

या मालिकेच्या सेटवर तिला गाढवाचं लग्न या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटात तिची एक छोटीशी भूमिका होती. मात्र याच सिनेमाच्या जोरावर तिला  दिग्दर्शक केदार शिंदे बकुळा नामदेव घोटाळे या अभिनेत्रीचा रोल दिला. 

8/9

अजिंठा या सिनेमातील सोनालीचा पारो प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण तिच्या या लूकसाठी तिला दररोज दोन तास मेकअप करावा लागत होता. तब्बल 45 दिवस तिला हा मेकअप करावा लागला. 

9/9

सोनाली समोर मराठी इंडस्ट्रीत एक महत्त्वाच आव्हान होतं ते नावाचं कारण सोनाली कुलकर्णी नावाच्या दोन अभिनेत्री आहेत. मग तिला छोटी सोनाली कुलकर्णी म्हणजे ज्युनियर सोनाली अशी ओळख मिळाली. शिवाय तिने नावाच्या स्पेलिंगमध्येही बदल केला तिचं नाव Sonalee असं लिहिते.