राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या

शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत  मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 17, 2024, 08:12 PM IST
राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या  title=

Mahayuti Rally Shivaji Park Mumbai : शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या हायव्होल्टेज सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच मंचावर एकत्र आले.  जे सत्तेत येणार नाहीत त्यांच्यावर का बोलावे असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे महाविकासआघाडीवर निशाणा साधला .  राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता माझ्या 3 मागण्या पूर्ण करा असं म्हणत राज ठाकरे यांनी मागण्याची यादी वाचून दाखवली. 

राम मंदिर बनवू असे फक्त सांगितले जात होते. राम मंदिर कधी बनेल असे वाटले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर प्रत्यक्षात उभे राहिले. 370 कलम रद्द झाले आता गड किल्ल्यांचे संवर्धन करा. मोदीजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा.  मोदींनी मागच्या पाच वर्षांत धाडसी निर्णय घेतले. मोदीजी मी तुमच्यापुढे पुढच्या पाच वर्षांसाठी उभा आहे असे राज ठाकरे म्हणाले. 

शिवाजी पार्कवरच्या सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले.. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री  अजित पवार मात्र थेट सभास्थळी पोहोचले... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा पार पडली.. तर दुसरीकडे अजित पवार मात्र स्टेजवर बसून होते. त्यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण तसंच रामदास आठवले आणि उद्योग मंत्री उदय सामंतही स्टेजवर होते..