Loksabha Election 2024 : मोदींशिवाय हा देश कोणीच चालवू शकत नाही - मुख्यमंत्री शिंदे

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आणि महत्त्वाचे मतदार संघांमध्ये येत्या सोमवारी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जास्त जास्त मतदान होण्यासाठी नेतेमंडळांनी कंबर कसली असून प्रचार सभा, रॅली यांचा मोठ्या प्रमाणात आयोजन केलंय. 

Loksabha Election 2024 : मोदींशिवाय हा देश कोणीच चालवू शकत नाही -  मुख्यमंत्री शिंदे

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि पाचवा टप्प्यासाठी येत्या सोमवारी 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला असून आज मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा होणार आहे. याठिकाणी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकाच मंचावर असणार आहे. दुसरीकडे मुंबईत आज मविआची सभा होणार असून उद्धव ठाकरे, शरद पवार, रमेश चेन्नीथला, पटोले उपस्थित राहणाराय. 

17 May 2024, 19:05 वाजता

मुंबईतल्या लोकसभेच्या सहा उमेदवारांसाठी शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडतेय. या सभेला सुरुवात झाली असून राज ठाकरे उपस्थित झाले आहेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले एकाच मंचावर आले आहेत.

 

17 May 2024, 18:45 वाजता

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवरच्या सभेच्या निमित्तानं यंदा प्रथमच एका मंचावर येणार आहेत... मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींची त्याआधी प्रचार सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरेंचंही भाषण या सभेत होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे मात्र सभेआधी राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर थेट दाखल झाले.. तर उपमुख्यमंत्री अजित पवार थेट सभास्थळी दाखल झाले.. 

17 May 2024, 18:05 वाजता

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर 
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार 
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी दाखल 

 

17 May 2024, 15:56 वाजता

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आल आहे. त्यांना गळ्याचे इन्फेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तापही आहे, त्यामुळे त्यांना पुढील काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  

 

17 May 2024, 15:55 वाजता

शिरूर लोकसभा मतदार संघाच्या स्ट्रॉग रूमचा सीसीटीव्ही बंद ही केवळ अफवा

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील स्ट्रॉंग रुमला ठेवण्यात आल्या असून या स्ट्रॉंग रूमचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे डिस्प्ले सुरू आहेत. मात्र डिस्प्ले कॅमेरे बंद असल्याची ही अफवा पसरवली जात आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

 

17 May 2024, 14:23 वाजता

'मी कुटुंबवत्सल, मी फॅमिली मॅन',टू द पॉईंट मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं विधान

 

Uddhav Thackeray : मी कुटुंबवत्सल आहे. मी फॅमिली मॅन आहे.. मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.. तसंच मी माझ्या पत्नीला लपवत नाही असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलंय... झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी टू द पॉईंटमध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे विधान केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 May 2024, 13:56 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  'मी कुटुंबवत्सल, फॅमिली मॅन मग, माझ्या कुटुंबाचा विचार करणार ना' - उद्धव ठाकरेंची मुलाखत

मी कुटुंबवत्सल आहे. मी फॅमिली मॅन आहे.. मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.. तसंच मी माझ्या पत्नीला लपवत नाही असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलंय... झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी टू द पॉईंटमध्ये उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे विधान केलंय.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे

17 May 2024, 12:46 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत...इंडिया आघाडीच्या सभेपूर्वी केजरीवाल मातोश्रीवर जाऊन ठाकरेंसोबत निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत...ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल इंडिया आघाडीच्या रॅलीत सहभागी होणार आहेत...सभेपूर्वी केजरीवाल आणि ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जातेय...

17 May 2024, 12:45 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भाजप नेते गिरीश महाजन छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचलेयत...नाशिकमधील भुजबळ फार्मवर महाजनांनी भुजबळांची भेट घेतलीय...भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेनंतर महाजन तातडीने भुजबळांच्या भेटीला पोहोचलेयत...

17 May 2024, 12:12 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याच माणसांकडून बॅग चेक करून सारवासारव करतायत, अशी टीका अनिल देशमुख यांनी केलीय. 9 बॅगांसंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला होता... मात्र, दोन ते तीनचं बॅग चेक केल्याचं देशमुख म्हणाले. तर शिंदेंना आता पैसे वाटप करण्याशिवाय पर्याय नसल्याची टीकाही त्यांनी केली.