'या' सेलिब्रिटीमुळे समंथा - नागा चैतन्याच्या आयुष्याला लगलं गालबोट

'तुझ्यामुळेच सगळ झालं...', म्हणत कोणाला देते आहे दोष?  

Updated: Jul 5, 2022, 03:42 PM IST
'या' सेलिब्रिटीमुळे समंथा - नागा चैतन्याच्या आयुष्याला लगलं गालबोट title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध जोडप्यांनी घटस्फोट आपला मार्ग वेगळा केला. अशाच सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य. जेव्हा  दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि 2021 मध्ये चार वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये समंथा रुथ प्रभूने चित्रपट निर्माता करण जोहरला जोडप्यांमध्ये येणाऱ्या दुराव्यासाठी कारणीभूत ठरवलं आहे.  नुकताच 'कॉफी विथ करण 7' चा ट्रेलर रिलीज झाला. व्हिडीओमध्ये समंथा रुथ प्रभू असं वक्तव्य करताना दिसत आहेत.

'कॉफी विथ करण 7'चा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक कलाकार दिसत आहे. त्यात समंथा देखील आहे. ज्यामध्ये तिने करण जोहरला वैवाहिक जीवनात येणाऱ्या कटुतेसाठी दोषी ठरवलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समंथा रुथ प्रभू म्हणाली, 'खऱ्या वैवाहिक जीवनातील कटुतेचे कारण करण आहे. कारण सिनेमातून तू आयुष्य 'कभी खुशी कभी गम' सारख असल्याचं दाखवतोस... खऱ्या आयुष्या मात्र ते KGF सारखं असतं..'

समंथाची अशी प्रतिक्रिया ऐकून करण जोहर देखील थक्क झाला. सध्या 'कॉफी विथ करण 7' चा टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.