सामंथाला एका Instagram post साठी मिळतात 'इतके' कोटी; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

इन्स्टा कमाईचं कारण जरा जास्तच गाजतंय   

Updated: Jun 10, 2022, 03:33 PM IST
सामंथाला एका Instagram post साठी मिळतात 'इतके' कोटी; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबत सामंथा रुथ प्रभू हे नाव हिंदी आणि विविधभाषी कलाजगतांमध्ये चांगलंच गाजत आहे. 'पुष्पा' या चित्रपटात अवघ्या एका गाण्यात झळकूनही समंथानं रश्मिका मंदानाच्या लोकप्रियतेलाही टक्कर दिली. 

दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समंथाचंही नाव येतं. पण, चित्रपट हे तिचं अर्थार्जनाचं एकमेव साधन नाही. 

सोशल मीडियावर समंथा जितकी सक्रिय दिसते, तिला त्याचे तितकेच पैसेही मिळतात. अर्थात चित्रपट, जाहिरात आणि आता सोशल मीडियासुद्धा तिच्या कमाईत भर टाकत आहे. 

इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरील तत्सम माध्यमांवर समंथा विविध ब्रँड्सचं प्रमोशन करते. एका सोशल मीडिया (Instagram) पोस्टसाठी समंथा जितकं मानधन घेते तो आकडा पाहून एखाद्या सर्वसामान्य माणसाचे डोळेच चक्रावतील.

सूत्रांच्या माहितीनुसार समंथा एका इन्स्टा पोस्टसाठी जवळपास 2-3 कोटी रुपये इतकं मानधन घेते. हल्लीच तिनं BARBERRY BAG च्या ब्रँडचंही प्रमोशन केलं होतं. आता यासाठी तिनं किती पैसे घेतले असतील याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. 

खासगी आयुष्याची चर्चा 
तेलुगू चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता नागार्जुन याच्या मुलासोबतही सामंथाचे नाव जोडले गेले. समंथा ही नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यची EX WIFE हेाती. पण, अवघी 4 वर्षे त्यांचं हे वैवाहिक नातं टिकलं, नंतर मात्र या नात्यात वादळ आलं आणि दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. 

आगामी चित्रपटांविषयी सांगावं तर, सामंथा 'कथू वकुला कधाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय तिच्या 'शकुंतलम' या चित्रपटाचं शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे.