सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, सेहवाग या खेळाडूंचा एक वेगळा काळ होता. भारतानं पहिला टी-२० सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. 01 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता. मात्र या सामन्यातील खेळाडू काय करतात तुम्हाला माहितीये का?

वीरेंद्र सेहवाग :

त्या ऐतिहासिक सामन्यात सेहवागने भारतीय संघाचे नेतृत्व केले. सेहवागने 29 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी केली. सेहवाग सोशल मीडियावर मजेशीर पद्धतीने पोस्ट करतो. वीरू अनेक सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसला आहे.

सचिन तेंडुलकर :

त्या ऐतिहासिक सामन्यात सेहवागने भारतीय संघाचे नेतृत्व केले. सेहवागने 29 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी केली. सेहवाग सोशल मीडियावर मजेशीर पद्धतीने पोस्ट करतो. वीरू अनेक सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसला आहे.

दिनेश मोंगिया :

भारतीय संघाच्या विजयात दिनेश मोंगियाचाही महत्त्वाचा वाटा होता. दिनेश भारताच्या पदार्पणाच्या T20 सामन्यात 38 धावांची इनिंग खेळली. ४६ वर्षीय मोंगिया सध्या ओडिशा क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

एमएस धोनी :

या सामन्यात धोनी आपले खातेही उघडू शकला नाही. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळत असला तरी तो पुढचा सीझनही खेळू शकतो. धोनीही शेतीत हात आजमावत असून रांचीमध्ये त्याचे मोठे फार्महाऊस आहे.

दिनेश कार्तिक :

त्या सामन्यात दिनेश कार्तिकने 28 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या होत्या आणि तो 'प्लेअर ऑफ द मॅच' देखील ठरला होता. कार्तिकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही आणि तो आयपीएल 2024 मध्येही खेळताना दिसणार आहे.

सुरेश रैना:

या खेळाडूने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. डावखुरा फलंदाज रैनाने भारताच्या पहिल्या T20 सामन्यात नाबाद 3 धावा केल्या होत्या. रैना सध्या आंतरराष्ट्रीय सिरीजमध्ये कॉमेंट्री करतो.

इरफान पठाण :

टी-20 सामन्यात भारताचे पदार्पण इरफाननेही सहभाग घेतला, जरी त्याला एकही विकेट मिळाली नाही. इरफान पठाणने निवृत्तीनंतर कॉमेंट्रीच्या जगात आपला ठसा उमटवला आहे. एवढेच नाही तर इरफानने अभिनयाच्या दुनियेतही हात आजमावला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोब्रा या तमिळ चित्रपटात तो दिसला होता

हरभजन सिंग :

अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग डिसेंबर 2021 मध्ये निवृत्ती घेतली. हरभजन आता क्रिकेट एक्स्पर्टसोबतच समालोचकही झाला आहे. एवढेच नाही तर भज्जीने राजकारणातही प्रवेश केला असून तो आम आदमी पक्षाच्या (आप) तिकिटावर राज्यसभेचा खासदार आहे.

झहीर खान:

दीर्घकाळ भारतीय गोलंदाजीचा आधार असलेला वेगवान गोलंदाज झहीर खानने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीर खानने पहिल्या टी-20 सामन्यात दोन विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. झहीर प्रसिद्ध समालोचक बनला आहे.

VIEW ALL

Read Next Story