मुंबईत सोमवारी आलेल्या वादळाने प्रचंड दैना उडवली. घाटकोपरमध्ये वादळामुळे कोसळलेल्या होर्डिंगखाली दबून 15 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका भारतीय क्रिकेटर सर्फराज खानलाही बसला. वादळातून तो थोडक्यात बचावला.

मुंबईत ज्यावेळी वादळ आलं त्यावेळी सर्फराज खान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नेट सराव करत होता.

नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना अचानक आलेल्या वादळाने संपूर्ण नेट सर्फराज खानच्या अंगावर कोसळलं.

नेटमध्ये सर्फराज खान पूर्णपणे अडकला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सर्फराज खान मोठ्या प्रयत्नानंतर या नेटमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला

नेटमधून सुखरुप बाहेर पडल्यानंतर 18 नंबरची जर्सी घातलेल्या सर्फराज खानने बॅट आणि हेल्मेट उंचावत आनंद व्यक्त केला.

VIEW ALL

Read Next Story