लाखोंचा फायदा

Home Loan Tips : दरवर्षी एक EMI जास्त भरल्यानं तुमचा लाखोंचा फायदा; कसा ते पाहा

घराची किंमत

घर खरेदी करताना खूप कमी मंडळी अशी असतात ज्यांना घराची किंमत एकरकमी भरणं शक्य होतं. अन्यथा घराचा दर पाहता साधारण 20 ते 30 वर्षांसाठी हे कर्ज घेतलं जातं.

ईएमआय

ईएमआय भरण्याचंही एक तंत्र आहे. थोडक्यात जास्तीचा एक हफ्ता तुम्हाला लाखोंचा फायदा मिळवून देऊ शकतो.

व्याजदर

उदाहरणार्थ तुम्ही घर खरेदीवर 9.5 टक्के व्याजदरानं 20 वर्षांसाठी 40 लाखांचं कर्ज घेतलं आहे. तर दर महिन्यात तुम्ही 37285 रुपये कर्जाचा हप्ता भरणं अपेक्षित आहे.

लोन प्रिन्सिपल अमाऊंट

20 वर्षांमध्ये तुम्ही 49,48,459 रुपयांवर व्याजासहित 89,48, 459 रुपये इतकी रक्कम भरता. लोन प्रिन्सिपल अमाऊंट कमी करत गेल्यास हे कर्ज लवकर संपेल आणि व्याजही कमी होईल.

हफ्ता

वर्षाच्या सुरुवातीलाच जास्तीचा हफ्ता भरल्यामुळं तुमची प्रिन्सिपल अमाऊंट दरवर्षी कमी होत जाईल आणि कर्ज 20 ऐवजी 16 वर्षांमध्ये फिटून जाईल.

कर्ज

थोडक्यात इथं व्याजाचे साधारण 11.70 लाख रुपये कमी होतील. लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे प्रत्येक बँक ही सुविधा पुरवत नाही, त्यामुळं कर्ज घेताना सुरुवातीलाच हा मुद्दा स्पष्ट करून घ्या.

आर्थिक नियोजन

म्हणजे कर्जासाठीचं आर्थिक नियोजन करत असताना या गोष्टीमुळं तुमचे लाखो रुपये वाचतील असं तज्ज्ञांचं मत.

VIEW ALL

Read Next Story