तुम्हाला Social Anxiety तर नाही ना? ही लक्षणं अनुभवताय?

चिंता आणि तणाव

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात चिंता आणि तणाव ही सामान्य गोष्ट आहे. मात्र ही चिंता आणि तणावाचं रुपातंर मानसिक आजारात होतं, तर ही भीतीदायक गोष्ट ठरते.

Social Anxiety म्हणजे नेमकं काय आहे?

तज्ज्ञांच्या मते गेल्या काही काळात Social Anxiety चे रुग्ण वाढले आहेत.

सामाजिक संमेलनांना उपस्थित राहण्यास भीती

Social Anxiety चा त्रास ज्यांना होता त्या लोकांमध्ये नवीन ठिकाणी जाण्यास, नवीन लोकांना भेटण्यास किंवा सामाजिक संमेलनांना उपस्थित राहण्यास भीती जाणवते. या लोकांना सतत ही चिंता असते की, इतर लोकांकडून त्यांची चेष्टा होईल. या भीतीमुळे ते अनेकदा सामाजिक उपक्रमास जात नाहीत. परिणामी त्यांचे सामाजिक जीवन मर्यादित राहतं. त्यांना मित्र बनवणे आणि नातेसंबंध तयार करणे देखील कठीण जातं.

Social Anxiety लक्षणं

Social Anxiety लोकांमध्ये कुठली लक्षणं जाणवतात ते पाहा - आत्मविश्वास नसणे, चेष्टा केली जाण्याची भीती, नेहमी स्वत:ला इतरांपेक्षा कमी समजणे, एखाद्याशी बोलताना घाम फुटणे किंवा अडखळणे, नेहमी इतरांकडून न्याय मिळण्याची भीती वाटणे, लोकांमध्ये असूनही एकटे वाटणे.

CBT हे सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक असून जे लोकांना त्यांचे चिंताग्रस्त विचार आणि वर्तन ओळखण्यास आणि आव्हान देण्यास मदतगार ठरतं.

जास्तीत जास्त लोकांशी बोलवे

त्याशिवाय चिंता आणि नैराश्याची औषधे लक्षणे कमी करण्यात मदत होते. तसंच नियमित व्यायाम, निरोगी आहार आणि पुरेशी झोप हे घेणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त लोकांशी बोलवे हे उत्तम उपचार आहे.

VIEW ALL

Read Next Story