रियालिटी शो बिग बॉसच्या 16 व्या हंगामात अब्दू रोजिकने सहभाग घेतला होता. अब्दूची उंची केवळ तीन फूट आहे.

आता अब्दूच्या आयुष्यात मोठी घटना घडतेय. अब्दू लवकरच लग्न करणार आहे. सात जुलैला त्याचा निकाह पार पडेल.

रिपोर्टनुसार अब्दूचं लग्न UAE मधल्या मुलीशी ठरलं आहे. दोघंही गेल्या काही काळापासून रिलेशनशीपमध्ये होते.

अब्दूच्या होणाऱ्या पत्नीचं नाव अमीरा असं आहे. सात जुलैला युएईमध्ये अब्दू आणि अमीराचा निकाह होणार आहे.

अब्दूर रोजिकचं लग्न होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अब्दूवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अब्दूच्या लग्नाची बातमी पसरल्यानंतर चाहत्यांनी होणाऱ्या पत्नीचे सोशल मीडियावर शेअर करण्याची मागणी केली आहे.

19 वर्षांचा अब्दू रोजिक करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. दुबईत अब्दूचा शाहि महल आहे. तर तजाकिस्तानमध्येही त्याची संपत्ती आहे.

VIEW ALL

Read Next Story