World Cup 2023 : 5 डिसेंबरपासून रंगणार वर्ल्डकपचा थरार; टीम इंडियाचा पहिला सामना 'या' देशासोबत!

World Cup 2023 Schedule : सर्वांनाच उत्सुकता आहे ती ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. 

Updated: Jun 25, 2023, 04:12 PM IST
World Cup 2023 : 5 डिसेंबरपासून रंगणार वर्ल्डकपचा थरार; टीम इंडियाचा पहिला सामना 'या' देशासोबत! title=

World Cup 2023 Schedule : सर्वांनाच उत्सुकता आहे ती ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. मात्र अशातच अजून एक वर्ल्ड रंगणार आहे. हा वर्ल्ड कप आहे हॉकीचा. नुकताच या वर्ल्डकपची तारीख ठरली असून डिसेंबर मध्ये क्रिडा प्रेमींना याचा आनंद घेता येणार आहे. 

मलेशियामध्ये होणार हॉकी वर्ल्डकप

मलेशियामध्ये FIH हॉकी ज्युनियर वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. ही स्पर्धा 5 डिसेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 16 डिसेंबरला होणार आहे. बुकित जलील या नॅशनल हॉकी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हॉकी चाहते आता वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

भुवनेश्वरमध्ये रंगलेल्या गेल्या वर्ल्डकपमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाला ग्रुपच्या तुलनेने सोपा ड्रॉ मिळाला. मलेशियामध्ये शनिवारी ड्रॉ जाहीर करण्यात आलेत. यानुसार, क गटात भारत आणि दक्षिण कोरिया व्यतिरिक्त स्पेन आणि कॅनडाची टीम आहे. टीम इंडिया 7 डिसेंबरला स्पेन आणि 9 डिसेंबरला कॅनडाशी भिडणार आहे. 

या स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होणार आहेत. भारतीय ज्युनियर हॉकी टीमला यावेळी स्पेन, कॅनडा आणि दक्षिण कोरियासह गट C मध्ये स्थान देण्यात आलंय. तर मलेशिया, गतविजेता अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि चिली हे गट अ गटात आहेत. तर सहा वेळा चॅम्पियन जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्त हे गट ब मध्ये आहेत. ड गटात नेदरलँड, बेल्जियम, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ आहेत.

भारतीय खेळाडूंना चांगल्या कामगिरीचा विश्वास

भारताच्या उत्तम सिंगने स्पर्धेत चांगली कामगिरी करणार असल्याचं म्हटलंय. सिंग म्हणाले की, “सुलतान ऑफ जोहोर कप आणि ज्युनियर आशिया कपमधील विजयानंतर भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघ 2001 आणि 2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. भारत हा जर्मनी आणि अर्जेंटिना नंतरचा तिसरा संघ आहे ज्याने 1979 मध्ये सुरुवातीपासून एकापेक्षा जास्त वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे टीम नक्कीच चांगली कामगिरी करेल."