#AsiaCup2023 : पोरींनी करुन दाखवलं! हॉकी महिला ज्युनियर आशिया चषकावर कोरलं नाव, पंतप्रधानांकडून कौतुक

#AsiaCup2023: हॉकी महिला संघाने इतिहास रचला आहे. चार वेळचा चॅम्पियन दक्षिण कोरियाला नमवत त्यांनी ज्युनियर आशिया चषकवर आपलं नाव कोरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पोरींचं कौतुक केलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 12, 2023, 07:36 AM IST
#AsiaCup2023 : पोरींनी करुन दाखवलं! हॉकी महिला ज्युनियर आशिया चषकावर कोरलं नाव, पंतप्रधानांकडून कौतुक  title=
women hockey junior asia cup 2023 india win beat south korea indian team creates history pm narendra modi Congratulations to champions sports news in marathi

Hockey Junior Asia Cup : भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने (Women's Junior Hockey Asia Cup) कमाल केली राव...पहिले अंतिम फेरीत धडाक्यात एन्ट्री मारली आणि आता चार वेळचा चॅम्पियन दक्षिण कोरियाला हरवत ज्युनियर आशिया चषक भारतीय संघाच्या नावावर केलं. ज्युनियर हॉकी संघाच्या पोरींना इतिहास रचला (IND Wins Women's Junior Hockey Asia Cup) आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच ज्युनियर आशिया चषक जिंकल आहे. पोरींच्या या सोनेरी यशाचं कौतुक अख्खा भारत करत आहेत. 

गेल्या वर्षांनंतर ही स्पर्धा खेळल्या गेली. 2021 मध्ये ही स्पर्धा होणार होती पण कोरोनामुळे ती झाली नाही. दक्षिण कोरियाने या स्पर्धेवरील वचर्स्व पाहता पोरींची ही किमया भारतीयांचासाठी अभिमानाची बाब आहे. रोमंचक आणि थरार अशा खेळात एक एक अशी बरोबरी असताना कोण जिंकणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेत अखेरचा क्षणी भारतीय संघातील खेळाडूंने गोल करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला. (women hockey junior asia cup 2023 india win beat south korea indian team creates history pm narendra modi Congratulations to champions sports news in marathi )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळांडूंच ट्वीटवरुन कौतुक केलं आहे. ट्विटरवर त्यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की, ''महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2023 जिंकल्याबद्दल आमच्या युवा चॅम्पियन्सचं अभिनंदन. संघाने प्रचंड जिद्द, प्रतिभा आणि सांघिक कार्य खेळातून दाखवलं आहे. त्यांनी देशाला खूप अभिमान वाटेल असा इतिहास रचला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.''

तर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघाचं आशिया चषक चॅम्पियन बनणं ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. शिवाय महिला शक्तीला त्यांनी सलाम केला आहे. 

दरम्यान या विजयानंतर हॉकी इंडियाने महिलांसाठी बक्षिस घोषित केलं आहे. खेळांडूना प्रत्येक 2 लाख तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येक 1 लाख रोख बक्षीस घोषित केलं आहे.