IND vs ENG: उर्वरित टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट कोहली बाहेर, BCCI ने सांगितलं कारण

IND vs ENG: 3 सामन्यांसाठी अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.

सुरभि जगदीश | Updated: Feb 10, 2024, 12:11 PM IST
IND vs ENG: उर्वरित टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट कोहली बाहेर, BCCI ने सांगितलं कारण title=

IND vs ENG: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. अशातच 2 सामने खेळवले गेले असून 3 सामने बाकी आहेत. यावेळी 3 सामन्यांसाठी अखेर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. तर उप कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहची निवड केलीये. महत्त्वाची बाब म्हणजे उरलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली खेळणार नसल्याचं बीसीसीआयने म्हटलंय.

विराटबाबत बीसीसीआयने स्पष्ट केलं कारण

टीम इंडियाच्या घोषणा करण्यात आली असून विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठीही उपलब्ध नाहीये. वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली उर्वरित सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयने म्हटलंय. यावेळी बीसीसीआय कोहलीच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतं, असं नमूद करण्यात आलं आहे.

टीममध्ये राहुल-जडेजाची एन्ट्री मात्र...

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टेस्टनंतर रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर गेले होते. मात्र आता त्यांचं टीममध्ये कमबॅक झालंय. पण जरी त्यांचं कमबॅक झालं असेल तरीही वैद्यकीय टीमकडून फिटनेस मंजुरीनंतरच त्यांचा सहभाग शक्य होईल. म्हणजे जडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील हे निश्चित नाही.

टीम इंडियाची स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप

आवेश खानला टीममधून बाहेरचा रस्ता

उर्वरित 3 सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आवेश खानला टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. यावेळी वेगवान गोलंदाज आकाश दीपची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मोहम्मद सिराजचंही टीममध्ये कमबॅक झालं असून त्याला दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.

पुढचा सामना 15 फेब्रुवारी रोजी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सिरीजतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजकोटमध्ये होणार आहे. सिरीजतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. तर शेवटचा आणि पाचवा टेस्ट सामना 7 मार्चपासून धर्मशालामध्ये रंगणार आहे.

उर्वरित 3 सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आवेश खानला टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. यावेळी वेगवान गोलंदाज आकाश दीपची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मोहम्मद सिराजचंही टीममध्ये कमबॅक झालं असून त्याला दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.