Sikandar Shaikh Kusti Video: भर पावसात रंगला 3 मिनिटांच्या कुस्तीचा थरार, पाहा डोळ्याचं पारणं फेडणारा सामना!

Sikandar Shaikh kusti: विजांच्या कडकडाटासह भर पाऊसात तीन मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख याने दुहेरी पट काढत एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला (Ali Mehri) चितपट करत हनुमान केसरीचा (Hanuman Kesari) किताब पटकावला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 8, 2023, 10:00 PM IST
Sikandar Shaikh Kusti Video: भर पावसात रंगला 3 मिनिटांच्या कुस्तीचा थरार, पाहा डोळ्याचं पारणं फेडणारा सामना! title=
Sikandar Shaikh Kusti Video

Sikandar Shaikh VS Ali Mehri: भर पावसात रंगलेल्या कुस्ती मैदानात महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) इराणच्या अली मेहरी (Ali Mehri) याला चितपट केलं आहे. विजेत्या सिकंदर शेखला यावेळी चार लाखांचं रोख बक्षीस, बुलेट गाडी आणि हनुमान केसरी किताब देऊन गौरवण्यात आलं. सांगलीच्या (Sangali News) कुरळप या ठिकाणी हनुमान यात्रेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. (Sikandar Shaikh Kusti Video beat Ali Mehri in sagali watch)

पैलवान अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुरळप ग्रामस्थांच्या वतीने हनुमान यात्रेच्या निमित्ताने या जंगी कुस्त्यांचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये सुमारे 100 हून अधिक छोट्या-मोठ्या कुस्त्या (Sikandar Shaikh Kusti Video) पार पडल्या, तसेच महिलांच्याही यानिमित्ताने विशेष कुस्त्या संपन्न झाल्या. 

आणखी वाचा - मुसलमान म्हणून सिकंदरसोबत... कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

यावेळी चार लाख रुपये आणि बुलेट गाड़ीसाठी महान भारत केसरी पैलवान सिंकदर शेख आणि इराणच्या आंतरराष्ट्रीय विजेता अली मेहरी यांच्यात (Sikandar Shaikh VS Ali Mehri) प्रमुख लढत पार पडली, कुस्त्यांचे मैदान सुरू असताना पाऊसाने हजेरी लावली, आणि पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान अली मेहेरी यांच्यामध्ये देखील भर पावसात लढत झाली.

पाहा सामन्याचा Video -

दरम्यान, विजांच्या कडकडाटासह भर पाऊसात तीन मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख याने दुहेरी पट काढत एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला आहे. भर पावसात रंगलेल्या या कुस्ती स्पर्धा पाहून कुस्ती शौकण्यांचे डोळ्याचं पारणं फिटलं. तर भर पाऊसात पार पडलेल्या या कुस्ती मैदानात जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी देखील हजेरी लावत कुस्त्यांचा थरार अनुभवला.