800 KM रेंज, जबरदस्त फिचर्स; 28 मार्चला लाँच होणार Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कार

स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने 2021 मध्ये आपण वाहन निर्मितीत उतरणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता कंपनी बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणत आहे.  

Mar 13, 2024, 18:05 PM IST

स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने 2021 मध्ये आपण वाहन निर्मितीत उतरणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता कंपनी बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणत आहे.

1/8

स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने 2021 मध्ये आपण वाहन निर्मितीत उतरणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता कंपनी बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणत आहे.  

2/8

नुकतंच कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार Xiaomi SU7 ला समोर आणलं होतं. ही कार 28 मार्चपासून अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध असेल असं जाहीर करण्यात आलं आहे.   

3/8

चिनी बाजारात ही कार दाखल होणार असून, तेव्हाच किंमतीची घोषणा होणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरला या कारचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.   

4/8

कारचं डिझाईन टेस्ला आणि पॉर्शेसारखं असल्याची प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिली होती.   

5/8

Xiaomi चे सीईओ लेई जून यांनी सांगितलं आहे की, Xiaomi च्या कारमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीला महत्व देण्यात आलं आहे, जी तिला इतरांपेक्षा वेगळं बनवते.   

6/8

कंपनीने स्मार्टफोनप्रमाणेच कारमध्ये स्मार्ट फिचर्स दिले आहेत. याच महिन्यात कारची डिलिव्हरी सुरु होणार आहे.   

7/8

कंपनीचं म्हणणं आहे की, Xiaomi SU7 एक सेडान आहे जी कंपनीचा स्मार्टफोन, हायपरओएससह ऑपरेटिंग सिस्टम शेअर करेल. या कारचा लूक आणि डिझाइन जबरदस्त आहे.   

8/8

या कारच्या बेस मॉडेलमध्ये 73.6kW ची बॅटरी मिळेल, जी 668 किमीची रेंज देईल. तर टॉप मॉडेलमध्ये 101kwh ची बॅटरी असेल जी सिंगल चार्जमध्ये 800 किमीची रेंज देईल.