जगातील सर्वात खतरनाक 10 लढाऊ हॅलिकॉप्टर, ज्यामुळे शत्रुलाही फुटतो घाम!

वायूसेनेची ताकद असलेले लढाऊ हेलिकॉप्टर कोणत्याही परिस्थितीत मदतीला धावून शत्रूची कंबर मोडू शकतं. अशातच जगातील खतरनाक लढाई हेलिकॉप्टर कोणते? याविषयी सविस्तर जाणून घेऊया

| Apr 08, 2024, 16:31 PM IST

Worlds Top 10 Attack Helicopter : वायूसेनेची ताकद असलेले लढाऊ हेलिकॉप्टर कोणत्याही परिस्थितीत मदतीला धावून शत्रूची कंबर मोडू शकतं. अशातच जगातील खतरनाक लढाई हेलिकॉप्टर कोणते? याविषयी सविस्तर जाणून घेऊया

1/10

अपाचे हेलिकॉप्टर (Apache Helicopter)

हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेलं अपाचे हेलिकॉप्टची कॉम्बॅक्ट रेंज 476 किलोमीटर इतकी आहे. सर्वाधिक 20 हजार फूट उंचीवरून देखील निशाणा भेदण्याची ताकद या हेलिकॉप्टरमध्ये आहे. Hydra-70, CRV, APKWS हे रॉकेट यातून वापरले जाऊ शकतात. तसेच स्टिंगर, एजीएम-65 मैवरिक आणि स्पाइक मिसाइल देखील हवेतून हवेत शत्रूचा गेम करू शकते.

2/10

एमआईएल एमआई 28 एनएम हैवक (Mil Mi-28NM Havoc)

रशियन वायूसेनेची ताकद म्हणून वापरण्यात येणारं . एमआईएल एमआई 28 एनएम हैवक हेलिकॉप्टर 12 हजार फूटावर उडू शकतं. 435 किलोमीटरवर नजर ठेवण्यासाठी रशियाने खास हे हेलिकॉप्टर तयार केलंय. तब्बल 16 रॉकेट्स अन् मिसाईल भेदण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे.

3/10

बेल एएच-1जेड वाइपर (Bell AH-1Z Viper)

अमेरिकन वायूसेनेचं महत्त्वाचं हत्यार म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे  बेल एएच-1जेड वाइपर हेलिकॉप्टर... 690 किलोमीटरची कॉम्बॅक्ट रेंज अन् 300 km/hr ची स्पीड असलेलं हेलिकॉप्टर दोन पायलट उडवू शकतात.

4/10

यूरोकॉप्टर टाइगर (Eurocopter Tiger)

फ्रान्स आणि जर्मनी यांच्या प्रयत्नातून यूरोकॉप्टर टाइगरची निर्मिती झाली होती. फ्रान्स जर्मनी तसेच ऑस्ट्रेलिया आणि स्पेनची वायूसेना देखील याच यूरोकॉप्टर टाइगरचा वापर करते. याची स्पीड 290 km/hr आहे.  800 किलोमीटर कॉम्बैट रेंज असलेलं हे हेलिकॉप्टर 13 हजार फुटावर देखील उडू शकतं. मिसाइल आणि रॉकेट्स भेदण्याची क्षमता यामध्ये आहे.

5/10

टीएआई टी129 एटीएके (TAI T129 ATAK)

तुर्कीच्या वायूदलाची शक्ती मानल्या जाणारं टीएआई टी129 एटीएके हेलिकॉप्टर 281 km/hr च्या स्पीडने शत्रूवर हल्ला करतो. 76 रॉकेट यातून लाँच केले जाऊ शकतात. 

6/10

कामोव केए-52 (Kamov Ka-52)

रशियाचं घातक असं कामोव केए-52 हेलिकॉप्टर शत्रूला घाम फोडतं. 470 किमी रेंज असलेलं हे हेलिकॉप्टर 315 km/hr च्या स्पीडने अवकाश भेदून टाकतं. 4 इग्ला मिसाइल आणि 12 एंटी-टैंक मिसाइल याला लावले जातात.

7/10

अगस्ता ए129 मांगुस्ता (Agusta A129 Mangusta

इटलीने आत्तापर्यंत तयार केलेले अगस्ता ए129 मांगुस्ता हेलिकॉप्टर दोन वैमानिक उडवू शकतात. याची तासी स्पीड 278 प्रतितास आहे. या हेलिकॉप्टरमध्ये थ्री-बैरल गैटलिंग गन लावलेली आहे. तसेच मशीन गन पॉड देखील आहे.

8/10

एमआईएल एमआई-24 (Mil MI-24)

सर्वात युनीक डिझाईन असलेलं रशियाचं एमआईएल एमआई-24 हेलिकॉप्टर खतरनाक हेलिकॉप्टरपैकी एक आहे.  335 km/hr स्पीडने उडणाऱ्या या हेलिकॉप्टरची संख्या 2648 आहे. आठ लोकं बसण्याची क्षमता याची आहे. यातून सात मिसाईल लॉच केले जाऊ शकतात.

9/10

चांघे जेड-10 (Changhe Z-10)

 रूसी कामोव डिजाइन ब्यूरो तयार केलेलं चीनचं स्वदेशी हेलिकॉप्टर चीनची वायूसेना वापरते. दोन पायलट असलेलं हे हेलिकॉप्टर 270 km/hr स्पीडने हवेत झेप घेतं. याला चार हार्डप्वाइंट्स लावले आहेत. तर सहा रॉकेट्सचा मारा देखील यातून केला जाऊ शकतो.

10/10

डेनेल रूईवाक (Denel Rooivalk)

फ्रान्स कंपनीने बनवलेलं डेनेल रूईवाक हे हेलिकॉप्टर जगातील घातक हेलिकॉप्टरपैकी एक आहे. साऊथ अफ्रिका हे हेलिकॉप्टर वापरते. दोन पायलट 278 km/hr च्या स्पीडने हे हेलिकॉप्टर हवेत करामती करू शकतात. यामध्ये मोकोपा एंटी-टैंक गाइडेड मिसाइल सेट केली आहे