उद्धव ठाकरे यांचा बोईसर-वांद्रे लोकल प्रवास, विन्डो सीटही मिळाली

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रचारसभांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये सभा पार पडली. सभा संपल्यनंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते वांद्रे एसा लोकलने प्रवास केला

| Apr 12, 2024, 20:10 PM IST
1/7

पालघर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची पालघरमध्ये सभा झाली.  या सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. 

2/7

महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालणार नाही. महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि पवारांचंचं नाणं चालणार म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांवरही टीका करताना उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील फोन आला की मिंधेंची दाढी कापते चळाचळा अशी टीका केलीये.

3/7

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बोईसर ते वांद्रे असा लोकलने प्रवास केला. उद्धव ठाकरे बोईसर रेल्वे स्थानकावर पोहोचात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

4/7

बोईसर रेल्वे स्थानकावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. 

5/7

बाईसर लोकल स्थानकावर येताच उद्धव ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते आणि मीडियाने डब्यात शिरण्यासाठी एकच गर्दी केली. उद्धव ठाकरे लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये बसले. त्यांना विंडोसीट मिळाली. त्यांच्या शेजारी संजय राऊत बसले होते. तर समोर मिलिंद नार्वेकर बसले होते.

6/7

लोकलमध्येही उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत डबा दणाणून सोडला. उद्धव ठाकरे यांचे फोटो टिपण्यासाठी मीडियानेही एकच गर्दी केली होती.

7/7

दरम्यान, शिवसेनेला नकली म्हणायला ती तुमची डीग्री आहे का... तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय.. तुम्ही बाहेरचे अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शाहांवर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महाराष्ट्रातल्या प्रचार सभेत नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं. त्यावरुनच उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय.