'पुष्पा 2: द रुल' ते 'सिंघम अगेन '2024 मध्ये प्रदर्शित होणार 'हे' खास प्रोजेक्ट्स

2024 हे आतापर्यंतचे सर्वात मनोरंजक वर्ष ठरले आहेत आणि यावेळी अनेक प्रोजेक्ट्स हे OTT आणि थिएटर दोन्ही ठिकाणी येणार आहेत. चला तर पाहुया यंदाची मस्ट वॉच प्रोजेक्ट्स... ज्याची सगळे आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. 

| May 12, 2024, 15:38 PM IST
1/7

'पुष्पा 2 - द रुल'

सुकुमार आणि अल्लू अर्जुन या हिटमेकर जोडीला एकत्र आणणाऱ्या या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिक्वेलच्या टीझरनं पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

2/7

दिल्ली क्राइम सीझन 3

'दिल्ली क्राइम’च्या पहिल्या दोन सीझननं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं आणि आता या सीरिजचा 3 भाग येणार आहे.

3/7

भूल भुलैया 3

रूह बाबा आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे यात शंका नाही. 

4/7

पंचायत 3

'पंचायत’चे पहिले दोन सीझन ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनातील आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दलच्या वास्तविक जीवनातील गोष्ट आहे. ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. त्याचा 3 सीझन या महिन्यात आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.

5/7

यो यो हनी सिंग: फेमस

प्रसिद्ध चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांनी दिग्दर्शित केलेला" यो यो हनी सिंग: फेमस' हा बहुप्रतिक्षित बायोपिक जो रॅपरच्या जीवनावर आधारित असून त्याच्या कारकिर्दी ची गोष्ट सांगणार आहे.  'ह्यूमन' आणि 'जुबान' सारख्या त्याच्या कामासाठी लोकप्रिय असलेला मोझेझ सिंग हनी सिंगच्या चाहत्यांना एका मनोरंजक राइडवर घेऊन जाणार आहे

6/7

कल्कि 2898 एडी

प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानीचा कल्कि 2898 एडी हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

7/7

सिंघम अगेन

'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, श्वेता तिवारी हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट देखील ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जाते.