'गोष्ट तशी गमती'ची नाटकाचा सिक्वेल येणार

अव्दैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहीर राजदा लिखित गोष्ट तशी गंमतीची या नाटकाने रसिकांना चांगलीच भूरळ घातलीये. 

Updated: Jun 30, 2016, 03:53 PM IST
'गोष्ट तशी गमती'ची नाटकाचा सिक्वेल येणार title=

मुंबई : अव्दैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहीर राजदा लिखित गोष्ट तशी गंमतीची या नाटकाने रसिकांना चांगलीच भूरळ घातलीये. 

या नाटकात शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या नाटकाचे तब्बल 300 प्रयोग झाले. आता निर्माता-दिग्दर्शकांनी या नाटकाचा सिक्वेल आणण्याचा चंग बांधलाय.

निर्माता-दिग्दर्शकांनी गोष्ट तशी गंमतीची 2 या नाटकाची घोषणा केली आहे. त्यामुळे पहिल्या नाटकाप्रमाणे हे नाटकही रसिकांना आवडेल, अशी आशा करायला हरकत नाही..