Mumbai Job:माझगाव डॉकमध्ये कमी शिक्षण असलेल्यांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Job: रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 26 जुलै 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अपूर्ण किंवा मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या

Pravin Dabholkar | Updated: Jul 11, 2023, 09:33 AM IST
Mumbai Job:माझगाव डॉकमध्ये कमी शिक्षण असलेल्यांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज title=

Mazagon Dock Recruitment 2023: आठवी, दहावी उत्तीर्ण असेल तर चांगली नोकरी मिळणार नाही असा अनेकांचा समज असतो. तुम्ही देखील असा विचार करत असाल तर थोडं थांबा! मुंबईतल्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या जागांवर उच्चशिक्षित नव्हे तर कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिसची 466 पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.  माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी आठवी, दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय वर्ग क – 15 ते 19 वर्ष, वर्ग ख – 16 ते 21 वर्ष, वर्ग ग – 14 ते 18 वर्ष इतके असावे.

अर्ज शुल्क 

सामान्य, OBC, EWS आणि AFC श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

असा पाठवा अर्ज 

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी पुढीलप्रमाणे करा अर्ज 

सर्वप्रथम MDL ची अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in वर जा.
 करिअर सेक्शनमध्ये ऑनलाइन भरतीवरील ट्रेड अप्रेंटिसवर क्लिक करा. 
QR कोड स्कॅन करा.
अप्रेंटिस विभागात 'नवीन खाते' या पर्यायावर क्लिक करा.
आता अर्जदारांनी स्वत:ची नोंदणी करा.
खात्यात लॉग इन करून अर्ज करा.

या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 26 जुलै 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अपूर्ण किंवा मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

नॉन एक्झिक्युटीव्हच्या 60 जागा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटीव्हच्या 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीदेखील 26 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

ट्रेनरची भरती 

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये ट्रेनरच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज अर्ज पाठविण्याचा पत्ता  – एजीएम, (एटीएस), गेट नंबर 9, अल्कॉक यार्ड, डॉकयार्ड रोड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई – 400 010 या पत्त्यावर पाठवायचे आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा