Loksabha Election 2024 Live Updates: महापालिकेत 25 वर्ष सत्ता उपभोगलेल्यांनी मुंबईसाठी काय केले?- मुख्यमंत्री

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यामध्ये 13 मतदरासंघांमध्ये मतदान होणार आहे. या 13 मतदारसंघांमध्ये मुंबई आणि उपनगरांमधील सर्व मतदारसंघांचा समावेश असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आता मुंबईत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अधिक जोर धरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिवशभरातील घडामोडींवर नजर टाकूयात...

Loksabha Election 2024 Live Updates: महापालिकेत 25 वर्ष सत्ता उपभोगलेल्यांनी मुंबईसाठी काय केले?- मुख्यमंत्री

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आजपासून जोर धरणार आहे. मुंबईसहीत सर्वच उपनगरांमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार असल्याने आता पुढील काही दिवस राज्याच्या राजधानीमधील राजकारण ढवळून निघाणार असल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधानांपासून ते राज्याबरोबरच देशातील प्रमुख नेते मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण या लाइव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील ठळक घडामोडी पाहणार आहोत.

14 May 2024, 20:49 वाजता

रोहित पवार हा बालिश व्यक्ती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय...राष्ट्रवादीचा चिन्ह निवडणुकीनंतर गोठवल्या जाणार असल्याची स्वप्न रोहित पवार पाहत असून तुतारीच गाजर कसं झालं याकडे रोहित पवारांनी पहावं असल्याचं ही मिटकरी म्हणाले.

14 May 2024, 19:48 वाजता

पालघरमध्ये महा विकास आघाडीचे उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचाराला जोरदार शक्ती प्रदर्शन करून सुरुवात केली आहे. पालघर मधील प्रस्तावित वाढवण बंदराला महविकास आघाडीचा विरोध असून वाढवण बंदर होऊ देणार नाही असा नारा देत आपण जनतेच्या बाजूंनी असल्याचं सांगत महविकास आपलाच विजय निश्चित आहे असा विश्र्वास आघाडीचे उमेदवार भारती काम डी यांनी व्यक्त केलंय.

14 May 2024, 19:10 वाजता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिरा भाईंदर मध्ये आगमन. भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदानात हेलिपॅड वर आगमन. हेलिपॅड वरून भाईंदर पूर्वेला जाहीर सभेसाठी रवाना. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या जाहीर सभेला संबोधित करणार

14 May 2024, 17:58 वाजता

14 May 2024, 17:06 वाजता

पायाखालची वाळू सरकली तशी मोदी वारंवार महाराष्ट्रात प्रचार सभा घेतायत- प्रकाश आंबेडकर

14 May 2024, 16:25 वाजता

वंचीत बहुजन आघाडीचे कल्याण मतदारसंघातील उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची उल्हासनगर मध्ये सभा

14 May 2024, 16:02 वाजता

पालघर-डहाणू येथे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेसाठी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

14 May 2024, 15:21 वाजता

पदवीधर आणि शिक्षक निवडणुक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

14 May 2024, 15:20 वाजता

रवींद्र धंगेकरांसहीत 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील मतदानाच्या एक दिवशी आधी म्हणजेच 12 मे रोजी रात्री धंगेकर यांनी सहकार नगर पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. महायुतीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसेवाटप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी धंगेकर आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस स्टेशनसमोर मोठा राडा झाला होता. आंदोलनादरम्यान महायुतीचे कार्यकर्ते देखील पोलीस स्टेशनसमोर गोळा झाले होते. त्यामुळे दोन गटात वादावादी होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

14 May 2024, 14:59 वाजता

'हा काय पोरकटपणा...', नकली शिवसेना, राष्ट्रवादी म्हणणाऱ्या PM नरेंद्र मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर, 'उद्या निवडणुकीत...'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी अशी टीका केल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. हा पोरकटपणा आहे अशा शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त