VIDEO: ना चाकू ना बंदूक! तरी लोकांना लुटणाऱ्या 'या' नव्या गँगची गावभर दहशत

Delhi Crime : दिल्लीत एका नव्या गॅंगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटण्यासाठी वापरलेली कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 18, 2023, 05:13 PM IST
VIDEO: ना चाकू ना बंदूक! तरी लोकांना लुटणाऱ्या 'या' नव्या गँगची गावभर दहशत title=

Delhi Crime : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Delhi News) गुन्हेगारीच्या रोज नव्या घटना घडताना दिसत असतात. यामध्ये हत्या, बलात्कार, सोनसाखळी चोरी, मारामारी यासारखे गुन्हे सातत्याने घडताना दिसत आहेत. पोलिसांनी (Delhi Police) वाटेल तितके प्रयत्न करुनही राजधानी दिल्लीत गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाहीये. अशातच आता दिल्लीत लुटमार करणाऱ्या गॅंगची दहशत पसरली आहे. या गॅंगच्या कृत्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

दरोड्याच्या घटनांमध्ये अनेकवेळा चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घटना घडतात. एवढंच नाही तर गुन्हेगारांनी हायटेक शस्त्रेही ठेवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दिल्लीत अशीच एक टोळी मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे जिच्या लुटण्याची पद्धत सर्वात वेगळी आहे. ही गॅंग चाकू, बंदूक किंवा इतर कोणत्याही शस्त्राने हल्ला करत नाही. टोळीतील सदस्य क्षणात हल्ला करतात आणि लूट करुन पळून जातात. या टोळीतील सदस्य समोरच्या व्यक्तीशी बोलू लागते. त्यानंतर टोळीतील एकजण समोरच्या व्यक्तीच्या मागे जाऊन त्याला गळा दाबून त्याला बेशुद्ध करतो. त्यानंतर चोरटे पैसे घेऊन पळून जातात.

असाच प्रकार दिल्लीच्या हरिनगर परिसरात घडल्याचे समोर आलं आहे. हरिनगर येथे चोरट्यांनी रस्त्यावरील रद्दी विक्रेत्याला लक्ष्य केले. या टोळक्याने आधी काहीतरी खरेदीचे बहाणे केले आणि नंतर त्यांच्यापैकी एकाने मागे जाऊन तरुणाचा गळा  आवळला. विक्रेत्याला बेशुद्ध केल्यानंतर आरोपींनी त्याचे 3200 रुपये घेऊन पळ काढला. या संपूर्ण घटनेचा थरार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये चोरट्यांनी किती निर्दयीपणे आणि हातचलाखीने हा गुन्हा केला हे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र आता दिल्लीत चोरटे दिवसाढवळ्या लोकांना लक्ष्य करत आहेत. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.