कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 27, 2023, 12:51 PM IST
कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल title=

Crime News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Delhi Crime) एका पोलीस कर्मचाऱ्याला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) समोर आलं आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एसयूव्हीने या पोलिसाला (Delhi Police) धडक दिली. गाडीने धडक दिल्याने पोलीस कर्मचारी हवेत फेकला गेला. या अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कल येथे हा भीषण अपघात झाला. पीडित पोलीस कर्मचारीआऊटर सर्कल येथे बॅरिकेड लावून वाहनांची तपासणी करत होता. त्याचदरम्यान, भरधाव वेगात आलेल्या एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यावेळी पोलीस कर्मचारी हवेत उडाला आणि बॅरिकेडवर पडला. त्यानंतर बॅरिकेडसह पोलीस कर्मचाऱ्याला चिरडत गाडीने पळ काढला. या अपघातानंतर पोलीस कर्मचाऱ्याल रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

24 ऑक्टोबर रोजी रात्री मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिल्ली पोलीस हवालदार रवी सिंह हे कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलवर वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी 52 वर्षीय आरोपी राम लखनने त्याच्या स्कॉर्पिओने हवालदार रवी सिंह यांना धडक देऊन पळ काढला. धडक बसताच रवी सिंह हवेत उडी उडाले आणि खाली पडून जखमी झाले. रवी सिंहला त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी भरधाव गाडीचा पाठलाग करून राम लखनला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.