Delhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video

Men Shot Dead in Salon : मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. (Salon Shocking Viral Video)

सौरभ तळेकर | Updated: Feb 10, 2024, 05:40 PM IST
Delhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video title=
Delhi Crime News Men Shot Dead Inside Najafgarh Salon Viral Video

Salon Shocking Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील गुन्हेगारीला (Delhi Crime News) उत आल्याचं पहायला मिळतंय. दररोज खून, माऱ्यामाऱ्या तसेच बलात्काराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. अशा घटनांमुळे दिल्ली पोलिसांची (Delhi Police) नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता दिल्लीतून हादरवणारी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच भरबाजारात गोळीबार झाल्याने दिल्लीत खळबळ उडाली होती. अशातच आता दिल्लीमधील सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार (Men Shot Dead in Salon) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नेमकं काय झालं? 

दिल्लीजवळच्या नजफगडमधल्या द्वारका परिसरातील सलून नेहमीप्रमाणे सुरू होतं. दररोजप्रमाणे गर्दी देखील सलूनमध्ये होती. त्याचवेळी सलूनमध्ये दोन आरोपी घुसले. त्यावेळी त्यांच्या हातात बंदूक असल्याने ग्राहक घाबरले. काहींनी बाहेर पळ काढला तर काहीजण सलूनमध्येच अडकले. दोन्ही आरोपी कोणा एका व्यक्तीचा शोध घेत असल्याचं दिसतंय. त्यावेळी एक व्यक्ती सलूनमध्ये बसला होता. त्यावर एका आरोपीने पिस्तूल ताणली आणि दुसऱ्या आरोपीने संबंधित व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला. 

मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. एक दोन नव्हे तर पाच गोळ्या मारल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोपी इसमाला मारत असताना एक तरुणी बाहेर आली आणि नेमकं काय झालं? हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इसम जखमी झाल्याचं पाहून तरुणीने देखील पळ काढल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय.

नजफगड पोलीस ठाण्यातील पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. गोळी लागून जखमी झालेल्या दोन इसमांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोन्ही व्यक्तींची नावं आशिष आणि सोनू अशी होती. उपचारांदरम्यान, दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती द्वारका येथील पोलीस उपायुक्त अंकित सिंह यांनी दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासांत पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार आशिष याआधी दोन गुन्ह्यांमध्ये अडकला होता. त्यामुळे दिल्लीत देखील पुण्यासारखं टोळीयुद्ध सुरू झालंय की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये.