शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे

Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 8, 2024, 03:53 PM IST
शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे title=

आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. यामुळे हे सूर्यग्रहण अतिशय खास आहे. कारण 50 वर्षांनंतर हे सर्वात मोठे असे ग्रहण असेल. हे ग्रहण सुमारे 5 तास 25 मिनिटे चालेल. सूर्यग्रहणाबाबत हिंदू धर्मात वेगवेगळ्या समजुती आहेत. सूर्यग्रहणाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर आणि गर्भवती महिलांवर होतो असं म्हटलं जातं. 

हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण शुभ मानले जात नाही. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी काही काम करणे निषिद्ध मानले जाते. सूर्यग्रहणाचा आरोग्यावरही परिणाम होतो असे म्हटले जाते. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी ही विशेष खबरदारी आणि काळजी घ्यावी असं सांगितलं जातं. 

गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी

सूर्यग्रहणाची किरणे अत्यंत घातक असतात. त्यामुळे सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये. या काळात महिलांनी आपल्या आवडत्या देवतेची पूजा करावी. आणि मंत्रांचा जप करावा. जेणे करुन मन प्रसन्न राहिल. असे मानले जाते की, सूर्यग्रहणाच्या काळात मुलाच्या आणि आईच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये. त्यामुळे गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये. कारण सूर्यग्रहणाच्या वेळी बाहेर पडणारी किरणे शरीरावर परिणाम करतात. 

हेल्थची काळजी कशी घ्यावी? 

सूर्यग्रहणाच्यावेळी बाहेर पडणारी किरणे ही घातक असतात. त्यामुळे थेट संपर्कात येण्यापेक्षा बाहेर पडणे टाळा. एवढंच नव्हे तर आहारावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे याकाळात जेवण करणेही टाळा. तसेच थेट सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका त्याकरिता योग्य ते चष्म्याचा वापर करावा. सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर डोळ्यांना काही सेकंद स्पष्ट दिसू शकणार नाही किंवा वेगवेगळे रंग दिसू शकतील. काळे डाग दिसू शकतात. अशी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास ताबडतोब नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घ्या.

सूर्यग्रहण पाहण्याची योग्य पद्धत 

  • सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करू नका.
  • सूर्यग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीवरील सौर फिल्टर वापरा.
  • ऑप्टिकल व्ह्यूफाइंडर किंवा कॅमेराद्वारे सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करू नका. याचाही डोळ्यांवर थेट पाहण्यासारखाच परिणाम होतो.
  • सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर ताबडतोब नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • डोळ्यांशी संबंधित अशा समस्या उद्भवू शकतात

ग्रहण किती काळ चालेल?

आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी 2024 सालचे पहिले ग्रहण होणार आहे. आज होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. परंतु उर्वरित जगामध्ये ते स्पष्टपणे दिसेल. भारतात रात्री ९.१२ वाजता ग्रहण सुरू होईल. हे 5 तास 25 मिनिटे चालेल.