राखी सावंत विरोधात शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा उभी; कारवाईची केली विनंती

सध्या सगळीकडे राखी सावंतची चर्चा आहे. ड्रामा क्वीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ड्रामा क्वीन तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर राखीचा 10 मिलीयन पेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. काही दिवसांपुर्वी राखीने लग्न करुन सगळ्यांना मोठा धक्का दिला होता. 

Updated: Aug 28, 2023, 08:36 PM IST
राखी सावंत विरोधात शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा उभी; कारवाईची केली विनंती title=

मुंबई : सध्या सगळीकडे राखी सावंतची चर्चा आहे. ड्रामा क्वीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ड्रामा क्वीन तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर राखीचा 10 मिलीयन पेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. काही दिवसांपुर्वी राखीने लग्न करुन सगळ्यांना मोठा धक्का दिला होता. मात्र अचानक राखीने घटस्फोट झाल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली. आणि तिच्या एक्स पतीवर अनेक आरोपही केले. आदिल खान दुर्रानी असं तिच्या एक्स पतीचं नाव आहे. एकेकाळी सगळी फक्त या दोघांच्या प्रेमाची चर्चा सुरु होती. मात्र अचानक त्यांच्या दुरावल्याच्या बातम्यांनी सगळ्यांनाच धक्का बसला. राखीच्या आरोपानंतर आदिल बरेच महिने तुरुंगात होता. मात्र नुकतीच त्याची सुटका झाली आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिल खान दुर्रानी राखीच्या विरोधात उभा राहिला आहे. राखीचे सगळे आरोप फेटाळून आदिल राखीवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. तर दुसरीकडे शर्लिन चोप्रा आणि राखी सावंतचा वादही पेटला होता. आता शर्लिन चोप्रा आदिलच्या बाजूने उभी राहिली असून राखीच्या पुन्हा एकदा विरोधात उभी राहिली आहे. नुकतीच शर्लिनने तिच्या स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये शर्लिन चोप्रा सायबर क्राईमला विनंती करताना दिसतेय, यावेळी बोलताना शर्लिन म्हणाली, मी आत्ता सायबर पोलिसांना विनंती करते की, राखी सावंतचं इन्स्टाग्राम हॅक झालं होतं की नाही याची चौकशी करा. तिच्यासोबत तिच्या शेजारी यावेळी राखीचा एक्स पती आदिल खान दुर्रानीदेखील दिसत आहे. शर्लिन यावेळी राखीवर चांगलीच संतापलेली दिसत आहे.

शर्लिन चोप्रा तिच्या बोल्ड ड्रेसिंग सेन्ससाठी आणि चित्रपटांमधील सनसनाटीपणासाठी ओळखली जाते. शर्लिन लवकरच 'पौरशपूर 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेब शोमध्ये शर्लिन 'राणी स्नेहलता'च्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या अभिनेत्री तिच्या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

तर दुसरीकडे राखी सावंत उमराह करण्यासाठी मक्का मदिना येथे पोहोचली आहे. मक्काच्या मस्जिद-अल-हराममध्ये राखी दिसली होती. तिथे तिने प्रार्थना करताना दिसली! दरम्यान, राखीने तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो व्हिडिओही शेअर केले आहेत.