सलमानच्या चित्रकलेपुढं सगळं फिकं! आमिर खानची 'गजनी' Painting पाहिली का?

Salman Khan Made Aamir Khan Ghajini Look : सलमान खाननं आमिर खानसाठी तयार केलं होतं 'गजनी'चं पोट्रेअल! 

दिक्षा पाटील | Updated: May 10, 2024, 11:10 AM IST
सलमानच्या चित्रकलेपुढं सगळं फिकं! आमिर खानची 'गजनी' Painting पाहिली का? title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Made Aamir Khan Ghajini Look : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या मल्टी टॅलेन्टसाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयासोबतच त्याची सिंगिग आणि पेन्टिंगच्या टॅलेन्टविषयी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सलमान त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पेन्टिंग करताना दिसतो. त्याचं पेन्टिंगवर असलेलं प्रेम आपल्या सगळ्यांनाच ठावूक आहे. त्याची झलक आपल्याला नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळते. तर सलमाननं 2008 मध्ये आमिर खानच्या 'गजनी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी एक पेन्टिंग बनवली होती. त्या पेन्टिंगमध्ये 'गजनी' चा लूक पाहायला मिळाला. 

या चित्रपटाला प्रमोट करत सलमाननं आमिरची पेन्टिंग दाखवली होती आणि त्यासोबत त्यांच्या मैत्रीचं लूक पाहायला मिळाला होता. जेव्हा या पेन्टिंगचं अनावरण करण्यात आलं तेव्हा गजनी या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री असिन देखील तिथे उपस्थित होती आणि ही पेन्टिंग पाहून तिला आश्चर्य झाले होते. त्याचे फोटो आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर हे फोटो पाहताच नेटकऱ्यांनी देखील सलमानच्या कलेची स्तुती करण्यास सुरुवात केली आहे.

सलमानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं सध्या 'सिकंदर' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. तर रश्मिकानं पोस्ट शेअर करत 'सिकंदर'साठी खूप उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या निमित्तानं 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा : मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापले

या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉस करणारा आहे. त्यांनीच 'गजनी', 'थुप्पाक्की', 'हॉलिडे: ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी' आणि 'सरकार' सारख्या तमिळ आणि हिंदी चित्रपट केले आहेत. मुरुगादॉस यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी या आधी सलमानच्या 2014 मध्ये आलेल्या 'जय हो' या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. ही स्क्रिप्ट त्यांच्या तेलुगू हिट असलेल्या 'स्टालिन' च्या हिंदी रिमेकसाठी होती. तर या चित्रपटाला संगीतबद्ध करण्याची सगळी जबाबदारी ही त्यांनी संगीतकार आणि गायक प्रीतमला दिली आहे. प्रीतमनं 'रेडी', 'बॉडीगार्ड', 'बजरंगी भाईजान', 'ट्यूबलाइट' आणि 'टाइगर 3' साठी सोबत काम केल्यानंतर प्रीतम आणि सलमान आता पाचव्यांदा एकत्र येणार आहेत.