सलमानचे Secrets सांगणार भाची अलीजेह? पण भाईजाननं आधीच दिला इशारा, म्हणाला...

Salman Khan Niece Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची अलीजेह सगळ्यांना सांगणार भाईजानचे सिक्रेट्स? अलीजेह बोलण्याआधीच सलमाननं दिला इशारा

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2024, 06:03 PM IST
सलमानचे Secrets सांगणार भाची अलीजेह? पण भाईजाननं आधीच दिला इशारा, म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Niece Alizeh Agnihotri : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा जवळपास दोन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तेव्हा पासूनच सलमान खानच्या कामासोबत त्याचं खासगी आयुष्य हे देखील चर्चेत राहतं. त्याच्याविषयी अनेक गोष्टी आजही कोणाला माहित नाही. त्याविषयी अनेकांना जाणून घ्यायचं आहे. हे सगळं कळलं देखील असतं, पण प्रेक्षकांची आतुरता ही सुरु होण्या आधीच संपवली आहे. सलमान आणि त्याची भाची अलीजेह अग्निहोत्री यांच्यामध्ये त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यावर चर्चा झाली होती. 

एका कार्यक्रमात अलीजेहला सलमानच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यावर प्रश्न विचारण्यात आला तर त्याशिवाय त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार का विचारलं. सलमान खानची भाची अलीजेहला सीएनएन-न्यूज18 राइजिंग भारत समिट कार्यक्रमात विचारण्यात आले होते की मामा सलमान खानवर चित्रपट बनवेल का? त्यावर उत्तर देत अलीजेह 'हो, नक्कीच असं म्हणाली.' जर तिला तिच्या मामावर पुस्तक लिहिणायचं असेल तर त्याला ती काय टायटल म्हणजेच नाव देईल? ती उत्तर देण्या आधीच सलमाननं मस्करीत म्हटलं की मी तिला कधीच माझ्याविषयी पुस्तक लिहू देणार नाही. सलमानचं वक्तव्य ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हे हसू लागले. मग त्यानं सांगितलं की जितकं तिला माझ्याविषयी माहितीये...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीजेहला हे देखील विचारण्यात आलं की सोहेल खान, अरबाज खान आणि सलमान खानमध्ये सगळ्यात जास्त आवडता मामा कोण आहे? तर उत्तर देत अलीजेह म्हणाली की 'प्रत्येत गोष्टीसाठी वेगळ्या मामाकडे जाते. उदाहरण द्यायचं झालं तर मला हसायचं असेल तर मी सोहेल मामाकडे जाते. तो खूप विनोद करतो. अरबाज मामा खूप चांगला सल्ला देतो. तो खूप चांगल्या प्रकारे आणि खूप स्पष्ट बोलतो. जेव्हा मला काही सल्ला हवा असेल तेव्हा मला विचारण्याची देखील गरज भासत नाही. स्वत: समोरून कॉल येतो.'

सलमानविषयी बोलताना अलीजेह म्हणाली की त्याच्या आजुबाजूला राहणं चांगलं वाटतं. कारण तो आठवण करुन देतो की तुला तुझ्या तारुण्याचा आनंद घ्यायला हवा आणि मनातून तरुण रहायला हवं... तो अजूनही बाळच आहे... तर कधी कधी त्याच्यासोबत राहिल्यावर मला असं वाटतं की मी अजून तरुण झालीये. 

हेही वाचा :  बॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीक

अलीजेहनं थ्रिलर ड्रामा 'फर्रे' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या या चित्रपटाला आणि अभिनयाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.