कतरिनाशी फ्लर्ट करणाऱ्या अभिनेत्यावर सलमान भडकला!

गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघं जण एकाच कपमधून कॉफी पिताना दिसले. यावरून या दोघांमधील जवळीक आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे अगदी कन्फर्म होतंय की सलमान खान कतरिनासाठी किती पझेसिव आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 28, 2018, 04:28 PM IST
कतरिनाशी फ्लर्ट करणाऱ्या अभिनेत्यावर सलमान भडकला!  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघं जण एकाच कपमधून कॉफी पिताना दिसले. यावरून या दोघांमधील जवळीक आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे अगदी कन्फर्म होतंय की सलमान खान कतरिनासाठी किती पझेसिव आहे. 

'दबंग टूर' पुण्यात असताना मनिष  पॉल, सलमान खान, कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा सारखे कलाकार बसले होते. यावेळी मनिष पॉल कतरिना कैफशी फ्लर्ट करताना दिसतो. यावेळी सलमान खान भडकला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

 

हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा. या व्हिडिओत सलमान खान कतरिनासाठी किती प्रोटेक्टिव्ह आहे हे अगदी स्पष्ट होतं. आपल्याला माहितच आहे सलमान खानला सगळेच घाबरून असतात.

 सलमान खानने 'मराठी'त मागितली कॉफी 

सलमान खान पुण्यात 'दबंग टुर' साठी त्यांचे परफॉर्मन्स सुरू करण्याआधी काही काळ मीडियाशी बोलत होता. त्यावेळेस प्रेस कॉन्फरस दरम्यान सलमान खानने मराठीमध्ये कॉफीची ऑर्डर दिली. 

कॅटरिनासोबत शेअर केली सलमान खानने कॉफी 

सलमान खानला कॉफी मिळताच त्याने टेबलवर ती कॅटरिना कैफसोबत शेअर केली आहे. हा व्हिडिओ मीडियाच्या कॅमेर्‍यामध्ये कैद झाला. त्यानंतर सध्या तो झपाट्याने सोशलमीडियात व्हायरलदेखील होत आहे.