विमान अपघातातून बचावली रश्मिका मंदाना! फोटो शेअर करत केला खुलासा

Rashmika Mandanna Flight : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती...

दिक्षा पाटील | Updated: Feb 18, 2024, 12:26 PM IST
विमान अपघातातून बचावली रश्मिका मंदाना! फोटो शेअर करत केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Rashmika Mandanna Flight :  दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानानं ज्या फ्लाइटमध्ये होती. त्या फ्लाइटची एमरजन्सी लॅंडिंग करावी लागली होती. त्या विषयी कळतात रश्मिकाा मंदानाच्या चाहत्यांना धक्का बसला ते घाबरले. ही फ्लाईट मुंबईहून हैदराबादला जात होती. तर या फ्लाइटनं टेकऑफ केल्याच्या 30 मिनिटात त्याच्यात काही खराबी असल्याचे कळले आणि त्यांना परत मुंबई विमानतळावर यावे लागले. 

रश्मिका मंदानानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. या फोटोत रश्मिका आणि तिच्यासोबत कोणी एक व्यक्ती दिसत आहे. आता तुम्ही जर त्या व्यक्तीला ओळखलं नसेल तर ती अभिनेत्री श्रद्धा दास दिसली होती. ही पोस्ट शेअर करत तिनं मृत्यूवर कशी मात दिली याविषयी सांगितलं आहे. तर हा फोटो स्टोरीवर शेअर करत रश्मिकानं कॅप्शन दिलं की 'फक्त तुमच्या माहितीसाठी आज अशा प्रकारे आम्ही मृत्यूवर मात केली आहे.'  दरम्यान, डेक्कन क्रॉनिकलनं दिलेल्या माहितीनुसार, ही फ्लाइट मुंबईहून हैदराबादला जात होती. त्यात काही टेक्निकल खराबी झाल्यानंतर टर्बूलंस असल्यानं 30 मिनिटांनंतर पुन्हा मुंबईला परतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेत कोणालाही काही दुखापत झाली नाही. 

Rashmika Mandanna Flight Emergency Landing actress shared photo how she got safe

रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर रश्मिका नुकतीच 'अॅनिमल' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ति डिमरी दिसले होते. याशिवाय ती लवकरच 'पुष्पा 2' या चित्रपटात दिसणार आहे. सुकुमारनं दिग्दर्शिक केलेला हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या  'सिंघम अगेन' सोबत प्रदर्शित होणार असल्यानं या दोघांमध्ये बॉक्स ऑफिसवर कशी लढत होईल हे पाहण्यासाठी देखील चाहते आतुर आहेत. तर पुष्पाचा फक्त दुसरा नाही तर त्याच्या 3 भाग देखील येण्याची मोठी शक्यता आहे. अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात यावर वक्तव्य केलं आहे. 

हेही वाचा : Pushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा

त्यानंतर रश्मिकाकडे कोणते प्रोजेक्ट्स आहेत त्याविषयी बोलायचे झाले तर तेलुगू आणि तमिळमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'रेनबो' या चित्रपटात ती दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'द गर्लफ्रेंड' हा तेलगू चित्रपट आहे. बॉलिवूड विषयी बोलायचे झाले तर ती विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटात दिसणार आहे.